खंडाळ्याजवळ कोसळलेली दरड हटविली; वाहतूक पूर्ववत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

रेल्वेच्या वतीने दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले, मध्य रेल्वेवरील मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळित झाली होती. अखेर मध्यरात्री दरड हटविल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु झाली.

लोणावळा : बोरघाटात खंडाळा ते मंकी हिलदरम्यान रेल्वे रुळांवर शनिवारी रात्री पुन्हा दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक विस्कळित झाली होती. मध्यरात्री दरड हटविल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली आहे.

शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. दरड रेल्वेच्या मिडल व अपलाइनवर पडल्याने रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा झाला होता. याच ठिकाणी शुक्रवारी दरड पडली होती. सुदैवाने यात मोठी हानी न होता वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नव्हता. मात्र, लोणावळा व खंडाळ्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने शनिवारी पुन्हा याच ठिकाणी दरड कोसळली.

रेल्वेच्या वतीने दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले, मध्य रेल्वेवरील मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळित झाली होती. अखेर मध्यरात्री दरड हटविल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु झाली.

Web Title: landslide in Khandala ghar Mumbai-Pune railway