खेड घाटातून जाताना जरा जपून

Khedghat
Khedghat

सातगाव पठार (पुण) : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड घाटात पाऊस सुरू झाल्यापासून दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. या कोसळणाऱ्या दरडी जरी लहान स्वरूपाच्या असल्या, तरी या ठिकाणी मोठी दरड कोसळण्याची शक्‍यता असल्याने प्रतिबंधात्मक उपाय करण्याची मागणी वाहनचालक करत आहेत.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यातच या खेड घाटातील बाह्यवळण रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. त्यामुळे अजूनही सर्व वाहने याच घाटातून प्रवास करत आहेत. पावसाळा सुरू असल्याने खेड घाटातील डोंगरावरील दगड माती सुटी होऊन घरंगळून खाली रस्त्यावर येत आहे.

खेड घाटात रोजच वाहतूक कोंडी होत असते. या घाटात तीव्र उतार, नागमोडी वळणे तसेच ठिकठिकाणी तुटलेले संरक्षक कठडे यामुळे हा घाटरस्ता धोकादायक बनत चालला आहे. हा घाटरस्ता जवळपास दोन किलोमीटरचा असल्याने जर येथे वाहतूक कोंडी झाली तर संपूर्ण वाहतुकीवरच याचा परिणाम होऊन वाहतूक मंदावते. एकंदरच खेड घाट रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनत चालला आहे. ही सर्व परिस्थिती पाहता जोपर्यंत नवीन बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत या जुन्या घाटरस्त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे. त्याबरोबरच धोकादायक दरडी लवकरात लवकर हटवाव्यात, अशी मागणी वाहनचालक करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com