बोपदेव घाटात दरडींचा धोका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

कोंढवा - पुणे-सासवड रस्त्यावर बोपदेव घाटात पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळून दगड व माती घाटात पडली आहे. जोराच्या पावसाने दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र या घाटाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून, उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

बोपदेव घाट हा इंग्रजी डब्ल्यू आकाराचा असून, अवघड व अतितीव्र चढ असणाऱ्या वळणावर दरवर्षी लहान-मोठ्या दरडी कोसळतात. पाणी वाहून जाणाऱ्या मोऱ्यांमध्ये राडारोडा तसाच पडला आहे. हा राडारोडा पावसाने वाहून रस्त्यावर येत असल्याने वाहतूक विस्कळित होते. दोन वर्षांपासून पडलेल्या मोठे दगड अद्याप तसेच पडून आहेत. डोंगरमाथ्यावर मोठ-मोठे दगड निसटले आहेत. जोराचा पाऊस आल्यास या दगडांखालील माती वाहून जाऊ शकते आणि हे दगड कोणत्याही प्रसंगी वाहनावर पडून मोठा अपघात होऊ शकतो. 

पुढील काही दिवसांतच माउलींची पालखी दिवे घाटातून सासवड येथे मुक्कामी जाणार आहे. त्या सुमारास दिवे घाटातून होणारी वाहतूक बोपदेव घाटमार्गे सासवडकडे वळविण्यात येते. तत्पूर्वी या घाटातील दरडींना जाळ्या बसवाव्यात व कोसळलेली माती व दगड हटवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: landslide risk in Bopdev Ghat