सिंहगड घाटात आठवड्यात दुसऱ्यांदा पडली दरड

राजेंद्रकृष्ण कापसे
रविवार, 15 जुलै 2018

सिंहगड परिसरात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सलग बारा दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. पावसात मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर सुरू असल्याने दरडी पडण्याच्या घटना सुरू आहेत. डोंगराच्या भेगात पाणी साठी माती वाहून गेल्याने दरडी पडत आहे.

पुणे : या आठवड्यात सिंहगड घाटात दुसऱ्यांदा दरड पडण्याची घटना शनिवारी सकाळी साडेसहा वाजता घडली. रविवारी पडलेल्या दरडीचा उर्वरित भाग आज पडला. दरड पडण्याचा धोका असल्याने वाहतूक बंद होती. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. 
पूर्वी पडलेल्या दर्दीपेक्षा ही मोठी दरड पडलेली आहे. यामुळे पूर्ण रस्ता बंद झाला आहे.

सिंहगड परिसरात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सलग बारा दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. पावसात मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर सुरू असल्याने दरडी पडण्याच्या घटना सुरू आहेत. डोंगराच्या भेगात पाणी साठी माती वाहून गेल्याने दरडी पडत आहे.

सिंहगडावर जास्त पाऊस असल्याने आतकरवाडी, कल्याणच्या बाजूला डोंगर रांगांमध्ये अनेक धबधबे सुरु आहेत. येथील ओढ्यात चांगले पाणी वाहत आहे.
या आठवड्यात रविवारी 8 जुलै रोजी घाटात दरड पडली होती त्याचा उर्वरित भाग त्याचा उर्वरित भागाला चीर पडलेली दिसून येतो यामुळे पुन्हा दरड पडणार हे माहिती असल्यामुळे वन विभागाने याबाबत दक्षता घेऊन वाहतूक थांबविली होती. रविवारी पडलेल्या दरडीतून जवळ 25 ट्रक दगड निघाला.  आजच्या पडलेल्या दरडीतून सुमारे 60 70 ट्रक दगड निघतील असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. 

या पडलेल्या दरडीमुळे पूर्ण रस्ता बंद झाला आहे. दरड पडल्याची माहिती मिळताच वनविभाग व वनसंरक्षण समितीचे सुरक्षा रक्षकांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली. आजूबाजूला पडलेले दगड गोळा केले. दिवसभर परिसरात पाऊस असल्याने दरड काढण्याचे काम आज करता आले नाही.

दरड पडलेल्या ठिकाणी आमदार भीमराव तापकीर यांनी शनिवारी संध्याकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नकुल रणसिंग यांच्यासह या ठिकाणी पाहणी केली. त्यांच्या समवेत, वनविभागाचे वनपाल हेमंत मोरे, बाळासाहेब जीवडे, बाजीराव पारगे, उमेश सरपाटील, अभिजित धावडे, माऊली कोडीतकर, महेश भोसले, प्रजोत लगड उपस्थित होते.

Web Title: landslide in Singhgad ghat at Pune