सिंहगड घाटात पडली दरड

landslide in Sinhagad Ghat
landslide in Sinhagad Ghat

खडकवासला(पुणे) : सिंहगड घाटात दरड पडली आहे. गडावरील घाट रस्ता बंद असल्याने त्याची फारशी अडचण जाणवली नाही. स्थानिकांच्या माहितीनुसार, मंगळवारी(ता.२९) रात्री साडेनऊ दहा वाजेपर्यंत रस्ता सुरळित होता. मध्यरात्री नंतर दरड पडली असा अंदाज व्यक्त केला आहे. 

धारजाई मंदिर व मोरदरी खिंडीच्यामध्ये मोठा दरड पडला आहे. यामध्ये लाल माती व मोठा गोल दगड आहे. मागील 15 20 दिवसांपूर्वी सिंहगड किल्ल्यावर जोरात पाऊस पडला होता. मागील आठ दिवसापासून पाऊस देखील थांबलेला आहे. तरी देखील ही दरड अचानक पडली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे 
 क्लिक करा

सिंहगडावरील स्थानिक नागरिक गडावर रात्री नऊ वाजता गडावर काही मुले आली होती. त्यावेळी, रस्ता सुरळीत होता. आज सकाळी गडावरील समाधी व स्मारकाची सफाई करणारे राहुल जोरकर, हॉटेलचे मालक विश्वनाथ मुजुमले हे गडावर जात असताना त्यांना त्यांना ही दरड पडल्याचे दिसले त्यांनी तातडीने वन विभागाला कळविले. 

गडावरील घाट रस्त्यात पडलेली दरड पडल्याची माहिती मिळाली. ती दरड काढण्यास सांगितले. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गड पर्यटकांसाठी बंद आहे. त्यामुळे, घाट रस्ता पर्यटकांच्या वाहतुकीला बंद आहे. त्यामुळे, कोणती घटना घडलेली नाही. अशी माहिती वन विभागाचे सहायक उपवनसंरक्षक संजय कडू यांनी दिली.

कुरकुंभमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग; लागोपाठ स्फोटांनी परिसर हादरला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com