राष्ट्रीय एकात्मता जपणारा भाषा संगम उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

टाकळी हाजी : नमस्कार...आदाब...असलाम...अलैकूम...हॅलो...नमोस्कार...
खुलंबाय..प्रणाम...नमस्कारम्‌...वणक्काम्‌...सत्‌ श्री अकाल पडलात ना संभ्रमात? भारतीय भाषांबद्दल प्रेम व आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी सरकारच्या वतीने भाषा संगम हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. त्याअंर्तत शाळांमध्ये परिपाठात वेगवेगळ्या भाषांचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळू लागले आहे. कधीच ऐकीवात नसणारी वेगवेगळ्या भाषिक वाक्‍यांविषयी शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल दिसून आले. 

टाकळी हाजी : नमस्कार...आदाब...असलाम...अलैकूम...हॅलो...नमोस्कार...
खुलंबाय..प्रणाम...नमस्कारम्‌...वणक्काम्‌...सत्‌ श्री अकाल पडलात ना संभ्रमात? भारतीय भाषांबद्दल प्रेम व आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी सरकारच्या वतीने भाषा संगम हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. त्याअंर्तगत शाळांमध्ये परिपाठात वेगवेगळ्या भाषांचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळू लागले आहे. कधीच ऐकीवात नसणारी वेगवेगळ्या भाषिक वाक्‍यांविषयी शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल दिसून आले. 

पुण्यातील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने 20 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर यादरम्यान हा उपक्रम राबविण्यात आला. देशातील 22 भाषांधील सामान्यतः बोलली जाणारी पाच साधी वाक्‍य परिपाठामध्ये वाचून घ्यावयाची होती. यामुळे विद्यार्थी नमस्कार, आदाब, असलाम अलैकूम, हॅलो, नमोस्कार, खुलंबाय, प्रणाम, नमस्कारमः, वणक्कामः, सत्‌ श्री अकाल, अशा एकाच अर्थाचे अनेक भाषीक शब्द मुले वाचू व बोलू लागली आहेत. या उपक्रमातून देशात वेगवेगळ्या भाषा असल्या तरी त्या शब्दाचा अर्थ एकच होता. याबाबत मुलांमधील विविध भाषांविषयी असलेले गैरसमज दूर होण्यास मदत झाली. डोंगरगण (ता. शिरूर) येथील शिवनगर जिल्हा परिषद शाळेने परिपाठात हे शब्द विद्यार्थ्यांकडून पाठ करून घेतले. त्याचा अर्थ समजून घेत विद्यार्थ्यांमध्ये होणारा संवाद मजेशीर वाटू लागला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी मराठीबरोबरच आसामी, सिंधी, उर्दू, इंग्रजी, अशा वेगवेगळ्या भाषेत बोलू लागले आहेत. 

"दररोज एक भाषा निवडून त्याचे चित्रीकरण अथवा फोटोसेशन करून सायंकाळी "भाषा संगम यू ट्यूब'वर अपलोड करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांना देण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे. यातून मुलांचे मनोरंजन होऊन नवीन भाषा शिकण्यास मिळत आहे,'' असे मुख्याध्यापक बाळासाहेब घोडे यांनी सांगितले. 

''शिरूर तालुक्‍यातील बऱ्याच शाळांमधून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. भविष्यात या मुलांना देशात भ्रमंती करताना या ज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. देशातील भाषांविषयी आत्मीयता वाढीस लागते.''
- बाळकृष्ण कळमकर, गटशिक्षणाधिकारी, शिरूर 
 

Web Title: Language Confluence programme for solicitous National integration