भाषा टिकविण्याची जबाबदारी साहित्यिकांवर - सुळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

वारजे - राजकारणी लोकांना साहित्यातून समाजाची परिस्थिती समजू शकते. त्यासाठी साहित्यिकांमध्ये चर्चा होत असेल, तर आम्ही सहभागी होऊ शकतो. तसेच आपली भाषा टिकविण्याची जबाबदारी साहित्यिकांची असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. पुणे महापालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन अंर्तगत आयोजित साहित्यिक कट्ट्याच्या उद्‌घाटनप्रसंगी सुळे बोलत होत्या.

या वेळी महापौर मुक्ता टिळक, ज्येष्ठ साहित्यिक न. म. जोशी, नगरसेविका दीपाली धुमाळ, नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, लक्ष्मी दुधाने, सायली वांजळे, बाबा धुमाळ, डॉ. माधवी वैद्य, वि. दा. पिंगळे, राजेंद्र वाघ, दीपक ढेलवान, अरुण पाटील आदी साहित्यिक उपस्थित होते.
महापौर टिळक म्हणाल्या, 'मराठी भाषा टिकविण्यासाठी महापालिकेने अनेक भागांत साहित्यिक कट्टे सुरू केले आहेत. त्यामध्ये अनेक नागरिकांनी सहभागी होऊन आपली मराठी भाषा जतन करावी. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाबा धुमाळ यांनी केले.

Web Title: language literature supriya sule