बनवा आकर्षक आकाशकंदील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

स्वत:च्या हाताने एखादी वस्तू तयार करण्याची मजा काही औरच असते. यंदाच्या दिवाळीत स्वत:च्या हाताने तयार केलेले आकाशकंदील लावण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. ‘सकाळ यंग बझ’तर्फे आकशकंदील बनविण्याची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ही कार्यशाळा विविध ठिकाणी रविवारी २० ऑक्‍टोबर रोजी होणार आहे.

पुणे - स्वत:च्या हाताने एखादी वस्तू तयार करण्याची मजा काही औरच असते. यंदाच्या दिवाळीत स्वत:च्या हाताने तयार केलेले आकाशकंदील लावण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. ‘सकाळ यंग बझ’तर्फे आकशकंदील बनविण्याची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ही कार्यशाळा विविध ठिकाणी रविवारी २० ऑक्‍टोबर रोजी होणार आहे.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे कलात्मक आकाशदिवे स्वत: कसे तयार करायचे, याचे मार्गदर्शन या कार्यशाळेत मिळणार आहे. सोप्या पद्धतीत तयार होणाऱ्या या वस्तूंच्या साह्याने यंदाच्या दिवाळीत मुलांना घर सजविता येणे शक्‍य आहे.

कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना जुने वृत्तपत्र, फेव्हिकॉल, स्टेप्लर आदी साहित्य घरून आणावे लागणार आहे. वस्तू तयार करण्यासाठी लागणारे इतर साहित्य ‘सकाळ’कडून देण्यात येईल. ही कार्यशाळा सर्व वयोगटांसाठी असून, पुणे व पिंपरी परिसरातील निवडक शाळा व मॉल्समध्ये होणार आहे. या कार्यशाळेची ठिकाणे पुढील बातमीमध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येईल. 
अधिक माहितीसाठी संपर्क - ८८०५००९३९५ किंवा ९५५२५३३७१३.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lantern making sakal young buzz workshop