पुणे जिल्ह्यातील पुरंदर व शिरूर तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ

corona1
corona1

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर व शिरूर तालुक्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत आजही मोठी वाढ झाल्याचे दिसले आहे. त्यामुळे या तालुक्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

 सासवड: पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील कोरोना पाॅझीटिव्ह रुग्ण आढळून येण्यात खंड नाही. आजही तीन रुग्ण तपासणी अहवालातून मिळून आले. तर, जेजुरी दोन व गराडे, पारगाव, भिवरी, कुंभारवळण प्रत्येकी एक, असे दिवसभरात तालुक्यात 9 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यातून पुरंदर तालुक्याची रुग्ण संख्या 156 वर पोचली. एकटे सासवड कालच्या 20 व आजच्या तीन पाॅझीटिव्हसह 104 वर गेल्याने काळजी वाढली. सासवड शहरातील लाॅकडाउन वाढण्याची शक्यता आहे.

पुरंदर तालुक्यातील तब्बल 27 गावात कोरोना संसर्ग पोचला आहे. तर कोरोनामुळे काल पाचवा बळी सुप्यात गेला.सासवड शहराची परिस्थिती गंभीर बनली आहे. लाॅकडाऊन पुढे वाढविला नाही; आणि पुणे कनेक्शनधून संसर्ग रोखला नाही, तर नियंत्रण राहणार नाही; हे स्पष्ट आहे.

तळेगाव ढमढेरे : रांजणगाव गणपती ( ता. शिरूर) येथे गेल्या आठवड्यात एका युवकाला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या संपर्कातील एक महिला व तीन पुरुषाला कोरोनाची बाधा झाली असून, आज त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश सातव यांनी दिली. 

२५ जून रोजी एका युवकाला कोरोनाची बाधा झाली होती, त्याच्या संपर्कातील आणखी दोघांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर हे तीनही रुग्ण उपचारानंतर ठणठणीत होऊन घरी आले आहेत. परंतु सोमवारी व मंगळवारी गावात राहणाऱ्या आणखी दोन कंपनी कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाची बाधा झालेल्या तरुणाच्या संपर्कातील आणखी चार जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आता रांजणगाव येथील एकूण सात रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. सलग तीन दिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. 

रांजणगाव गणपती येथील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधित व बफर क्षेत्र म्हणून गावचा परिसर घोषित केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीने पूर्ण खबरदारी घेऊन प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत, अशी माहिती सरपंच सर्जेराव खेडकर, उपसरपंच अजय गलांडे व ग्रामविकास अधिकारी किसन बिबे यांनी सांगितली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com