Video : पुणे स्टेशनवरील कॅन्टीनच्या सॅन्डविचमध्ये अळ्या

Larvae Found in the sandwich at canteen in the Pune station
Larvae Found in the sandwich at canteen in the Pune station

पुणे : पुणे रेल्वे स्थानकामधील एका कॅन्टीनच्या सॅन्डविचमध्ये अळ्या निघाल्याच्या धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. स्थानकावरील फलाट नंबर दोनवर असलेल्या अनिता नावाच्या कॅन्टीनमध्ये ही घटना घडली असून त्याबाबत संबंधित प्रवाशाने याबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

रेल्वे प्रशासनाकडून पुरविण्यात येत असलेल्या जेवणात अळ्या निघत असल्याचे अनेक प्रकार यापूर्वी झाले आहेत. त्यामुळे प्रवासी स्टेशनवरील कॅन्टीनचे खाद्यपदार्थ खाणे पसंत करतात. मात्र आता स्थानकांवरील कॅन्टीन देखील प्रवाशांना हानिकारक असलेले खाद्यपदार्थ पुरवत असल्याचे समोर आले आहे. याबाबतचा व्हीडीओ सध्या व्हायरल होत आहे.

अजित पवार यांनी सोडली भाजपची साथ; अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

तुषार देशमुख हे त्यांच्या नातेवाइकांना सोडविण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट काढून स्टेशनमध्ये गेले होते. भूक लागली म्हणून त्यांनी कॅन्टीनमधून सॅन्डविच घेतले. मात्र आपण खात असलेल्या सॅन्डविचमध्ये अळ्या असल्याचे लक्षात येताच त्यांनी ही बाब कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. मात्र, तुम्हाला दुसरे सॅन्डविच देतो. आम्ही हे सॅन्डविच या ठिकाणी बनवत नाही. ते दुसरीकडून आणतो असे म्हणून त्यांनी आपली जबाबदारी झटकली. त्यामुळे देशमुख यांनी याबाबत त्वरित रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली.

अजित पवार यांचा राजकीय सन्यास?

"ही चूक आमची नाही. आम्ही हे खाद्यपदार्थ दुसरीकडून आणतो, असे मला सांगण्यात आले. त्यामुळे मी तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप कॅन्टीन चालकावर काहीच कारवाई झालेली नाही. प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करता संबंधितांवर त्वरित कारवाई व्हावी,'' असे देशमुख यांनी सांगितले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

''सॅन्डविच उघडले नसते तर, अळ्या प्रवाशाच्या पोटात गेल्या असत्या. उद्या एखादा विषारी किडा पोटात गेला तर, काय करायचे. हा प्रकार रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला आहे. संबंधितांवर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे. ग्राहकांकडून आलेल्या तक्रारींवर त्वरित कारवाई होत नसल्याचे दिसते. रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या आरोग्याशी खेळत आहे.''
- हर्षा शहा, अध्यक्षा रेल्वे प्रवासी ग्रुप 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com