Pune Rains : पुण्यात 72 तासांमध्ये कोसळला गेल्या तेवीस दिवसांपेक्षा दुप्पट पाऊस

योगिराज प्रभुणे
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पुणे : पुण्यात 1 ते 23 सप्टेंबर दरम्यान पडलेल्या पावसाच्या दुप्पटीपेक्षा जास्त पाऊस गेल्या तीन दिवसांमध्ये कोसळला आहे. या महिन्यातील 26 पैकी फक्त एकच दिवसाने शहरात गैरहजेरी लावली. यापैकी पहिल्या 23 दिवसांमध्ये 90.9 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. तर, मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांमध्ये 196.3 मिलीमीटर पाऊस कोसळल्याची नोंद भारतीय हवामान खात्यात झाली आहे. 

पुणे : पुण्यात 1 ते 23 सप्टेंबर दरम्यान पडलेल्या पावसाच्या दुप्पटीपेक्षा जास्त पाऊस गेल्या तीन दिवसांमध्ये कोसळला आहे. या महिन्यातील 26 पैकी फक्त एकच दिवसाने शहरात गैरहजेरी लावली. यापैकी पहिल्या 23 दिवसांमध्ये 90.9 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. तर, मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांमध्ये 196.3 मिलीमीटर पाऊस कोसळल्याची नोंद भारतीय हवामान खात्यात झाली आहे. 

No photo description available.
पुण्यात ढगफुटीने सात जणांचा मृत्यू; मोठे नुकसान 
शहरात तीन दिवसांपासून रोज रात्री ढगांच्या गडगडाटासह धुवाधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा जोर इतका भयंकर होता की दोन ते तीन तासांमध्ये 50 ते 90 मिलीमीटर पावसाची नोंद रोजच्या रोज होत होती. रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहू लागले. त्यामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. या महिन्या 1 ते 23 या दरम्यान 19 सप्टेंबरला सर्वाधिक म्हणजे 25.9 मिलीमीटर पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाच्या तुरळक सरी पडल्या. मात्र, मंगळवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. त्या दिवशी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 55.9 मिलीमीटर पाऊस हवामान खात्याच्या शिवाजीनगर येथील वेधशाळेत नोंदला गेला.
Pune Rain : लेक टाऊनजवळील पूलच गेला वाहून; पाणीच पाणी 

मंगळवारी रात्री नऊ वाजता पुन्हा पावसाला सुरवात झाली. रात्रभर पाऊस पडत होता. सकाळी बुधवारी साडेआठ वाजेपर्यंत 87.3 मिलीमीटर पाऊस कोसळला. तर, बुधवारी रात्री नऊ वाजता पावसाला परत सुरवात झाली. मध्यरात्रीनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली. या दरम्यान सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 53.1 मिलीमीटर पाऊस पडल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. या तीन दिवसांमध्ये 196.3 मिलीमीटर पाऊस पडला. तर, त्या पूर्वीच्या 23 दिवसांमध्ये 90.9 मिलीमीटर पाऊस झाल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

Pune Rains : सिंहगड रस्त्याची पावसामुळे दैना
Pune Rain : पुण्यातील पावसात महापालिकेच्या ठेकेदाराचाच मृत्यू
Video: अग्निशामन दलाचा देवदूत, टब अन् त्यामध्ये बाळ...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Last 72 hours Rainfall in pune is more than past 23 days