मतदारांच्या संख्येत ५ वर्षांत दुपटीने वाढ

मतदारांच्या संख्येत ५ वर्षांत दुपटीने वाढ

पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत मतदारांच्या संख्येत सुमारे साडेनऊ लाखांनी म्हणजे दुपटीने वाढ झाली आहे. शहरात १८ वर्षे वयोगटातील तरुण मतदार आणि स्थलांतरीत नागरिक वाढल्यामुळे मतदारांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या १० लाख ६३ हजार १११ इतकी होती. ती यावर्षी एक जानेवारीअखेर २० लाख २५ हजार ६४५ इतकी झाली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅंटोन्मेंट आणि कसबा पेठ या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. वडगाव शेरी आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून येते. ही वाढ सुमारे दोन लाखांपर्यंत आहे, तर उर्वरित चार मतदारसंघांतील मतदार संख्यावाढीचे प्रमाण हे सव्वा ते दीड लाखापर्यंत आहे. या आकडेवारीवरून राजकीय पक्षांना आगामी लोकसभा निवडणुकीतील समीकरणे जुळवावी लागतील.

जानेवारी २०१९ अखेर विधानसभानिहाय मतदार संख्या 
(कंसात २०१४ लोकसभा निवडणुकीची आकडेवारी) :
  वडगाव शेरी - ४ लाख २६ हजार २२२ (२ लाख २० हजार ९०८)
  शिवाजीनगर - २ लाख ९७ हजार ९३३  (१ लाख ४८ हजार ६२९)
  कोथरूड - ३ लाख ८८ हजार ४८७   (१ लाख ९७ हजार १०५)
  पर्वती - ३ लाख ४५ हजार ६३३    (१ लाख ८९ हजार ५९२)
  पुणे कॅंटोन्मेंट - २ लाख ८१ हजार ३८९ (१ लाख ३७ हजार ६४८)
  कसबा पेठ - २ लाख ८५ हजार ९८१  (१ लाख ६९ हजार २२९)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com