ससूनमध्ये कर्करोग ओपीडीचे काम अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

पुणे - ‘सीएसआर’च्या (सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सब्लिटी) निधीतून ससून सर्वोपचार रुग्णालयात कर्करोग निदान आणि उपचारासाठी स्वतंत्र कर्करोग बाह्यरुग्ण कक्ष (कॅन्सर ओपीडी) उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. 

पुणे जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूरसह राज्यभरातून विविध रुग्ण उपचारासाठी ससूनमध्ये येतात. कर्करोगाचे निदान आणि उपचारासाठी स्वतंत्र कक्ष नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. त्यामुळे रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमध्ये स्वतंत्रपणे हा कक्ष उभारणीचा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून काही कंपन्यांनी आर्थिक साहाय्य करण्याची तयारी दर्शविली. यातून मुख्य इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावरील ‘नाक, कान, घसा’ विभागात कर्करोग बाह्यरुग्ण कक्षाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 

या संदर्भात नाक, कान व घसा विभागप्रमुख डॉ. समीर जोशी म्हणाले, ‘‘बाह्यरुग्ण विभागात सध्या जवळपास रोज २०० रुग्णांना तपासले जाते. त्यात बहुतांशी रुग्णांमध्ये कर्करोगाची लक्षणे दिसून येतात. ससूनमधील एकमेव कर्करोग बाह्यरुग्ण कक्ष नाक, कान व घसा विभागात उभारला जात आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.’’

Web Title: last phase of the operation of Cancer OPD in Sassoon