'पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्धांचा अवतार'

'पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्धांचा अवतार'

पुणे - ‘‘पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्धांचा अवतार आहे, असा दावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत बहिणाबाई यांच्या रचना व साहित्यातूनही हा दावा केल्याचे दिसून येते,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केले. 

आडकर फाउंडेशन व श्‍यामची आई फाउंडेशनच्या वतीने रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीच्या प्रमुख आणि नगरसेविका लता राजगुरू यांना शुक्रवारी ‘धम्मक्रांती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्या वेळी डॉ. कोतापल्ले बोलत होते. 

‘‘बौद्ध धर्माची स्थापना भारतात झाली. भारतातूनच तो जगभर पोचला; मात्र सध्यस्थितीत हा धर्म भारतातून नामशेष होतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बौद्ध अनुयायी गाफील राहिल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते,’’ असे सांगून डॉ. कोतापल्ले म्हणाले, ‘‘पंढरपूरच्या विठ्ठलाबाबत डॉ. आंबेडकर यांनी केलेल्या दाव्याबाबत इतिहास संशोधकांनाही कुतूहल होते. ग. ह. खरे यांनी डॉ. आंबेडकरांना भेटून याबाबत व्याख्यान द्यावे, अशी विनंती केली होती. मात्र काही कारणामुळे ते व्याख्यान होऊ शकले नाही.’’ 

या वेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, आडकर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद आडकर, श्‍यामची आई फाउंडेशनचे  अध्यक्ष भारत देसडला आदी उपस्थित होते.  

घटनेला विरोध करणाऱ्या प्रतिगामी शक्तींना विरोध करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती; परंतु त्यांचा तो प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही. हा प्रयोग यशस्वी झाला असता तर प्रतिगामी शक्तींना वेळीच वेसण बसली असती.
- डॉ. नागनाथ कोतापल्ले, ज्येष्ठ समीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com