पुण्यात कर्णबधिर आंदोलकांवर लाठीचार्ज

pune.jpg
pune.jpg

पुणे : समाजकल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन करणाऱ्या कर्णबधिर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा प्रकार सोमवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास घडला. कर्णबधिरांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी महाराष्ट्रभरातून आंदोलक जमले होते. सरकारचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधून घेण्यासाठी त्यांनी मागण्या पुर्ण न झाल्यास मुंबईपर्यंत पायी जाण्याचा निर्धार केला होता.

शिक्षण आणि नोकरीच्या वेळी येणाऱ्या अडचणींच्या संदर्भातील वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यभरातून तीन ते चार हजार कर्णबधिर पुण्यात आले आहेत. पुण्यातील समाज कल्याण आयुक्तालयासमोर सोमवारी सकाळपासून आंदोलन करत होते. समाज कल्याण आयुक्तांकडून त्यांच्या मागण्या पुर्ण झाल्या नाही तर मुंबईपर्यंत पायी चालत जाण्य़ाचा निर्धार त्यांनी केला होता.

पोलिसांनी तेथे बंदोबस्त तैनात केला होता. त्यांच्या मुंबईपर्यंत चालत जाण्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. त्यासोबतच त्यांची धरपकड सुरु केली. काही काळ समाज कल्याण आयुक्तालयासमोर चांगलीच धांदल उडाली होती. यात अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत. या सर्व प्रकारानंतर काही आंदोलक तेथे ठाण मांडून बसले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com