सावरगावला गोवर, रुबेला लसीकरण मोहीमेचा शुभारंभ  

सावरगावला गोवर, रुबेला लसीकरण मोहीमेचा शुभारंभ  

जुन्नर : सावरगांव (ता.जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज (ता.२७) जुन्नर तालुक्यातील गोवर रुबेला लसीकरण मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण व जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे यांच्या उपस्थितीत लसीकरण करून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. भोर यांनी दिली.

सावरगाव आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील ९ महिने ते १५ वर्षे या वयोगटातील ८ हजार ५०० बालकांना गोवर रुबेला लसीकरण शाळा,अंगणवाडी व आरोग्य संस्था पातळीवर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या लसीमुळे गोवर व रुबेला या आजारांपासून रोगप्रतिकारक शक्ती मिळणार असून त्यामुळे या आजारांपासून होणारे दिर्घकालीन दुष्परीणाम उदा. न्युमोनिया, अतिसार, कुपोषण, जन्मतः होणारे हृदयाचे, मेंदूचे व डोळ्यांचे आजार यापासून मुक्तता मिळणार आहे. ही लस पूर्ण सुरक्षित असून कोणत्याही गुंतागुंतीस तोंड देण्यास सर्व शासकीय आरोग्य संस्थांनी जय्यत तयारी केली आहे. तसेच जुन्नर, नारायणगांव, आळेफाटा येथील खाजगी बालरोगतज्ञांनी या मोहिमेस संपूर्ण सहकार्य जाहीर केले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश गोडे यांनी सांगितले.

यावेळी सावरगावच्या सरपंच रेणुका वारे, उपसरपंच दिपक बाळसराफ, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य व स्थानिक कार्यकर्ते विकी पारखे, रोहीदास गोरडे, उदय ढमढेरे, बालविकास प्रकल्प अधिकारी रविंद्र तळपे, हरीभाऊ हाके, गटशिक्षण अधिकारी पी. एस. मेमाणे उपस्थित होते. सूत्रसंचालन नरेंद्र देठे यांनी केले. आभार विजय दिवटे यांनी मानले.
फोटो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com