शहरात कायदा सुव्यवस्था बिघडली - विलास लांडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

पिंपरी - ‘‘शहराची सध्या वाईट परिस्थिती आहे. शास्तीकराचा निर्णय तोंडाला पाने पुसणारा आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. वाढीव कामाचे कोणतेही ठराव स्थायी समितीत येत आहेत. आयुक्त हवे तसे सक्षम नाहीत. तुकाराम मुंढे अथवा श्रीकर परदेशी यांच्यासारखे आयुक्त हवेत,’’ अशी परखड टीका विलास लांडे यांनी केली.

शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रशांत शितोळे, फजल शेख, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर उपस्थित होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत असताना नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतल्याचे नमूद करून लांडे म्हणाले, ‘‘पालिकेतील सत्तारूढ पक्षाचे काम चांगले नाही. आमच्या सदस्यांनी स्थायी समितीत चुकीच्या कामांना विरोध केला आहे. मात्र, आयुक्तांवर त्याचे बंधन नाही. त्यांना सर्व अधिकार आहेत. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनीही सभागृहात परखड भूमिका मांडली आहे. स्थायी समितीत प्रधानमंत्री आवास योजनेचा विषय मंजूर नाही. कोणत्या नातेवाइकाला ठेका द्यायचा याचा निर्णय बाकी आहे.’’

‘‘फडणवीस सरकार चांगले काम करत असल्याचे भासविले जात आहे. महिलांना सुरक्षितपणे बाहेर पडणेही अशक्‍य झाले आहे,’’ अशी तोफही त्यांनी डागली. प्रशांत शितोळे यांनीही मेट्रोच्या चुकीच्या नियोजनाबद्दल टीका केली.

Web Title: Law and order in the city spoiled vilas lande