स्थायी लोकअदालतीत 10 खटले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे - ऍड. असीम सरोदे यांच्यासोबत कार्यरत असलेल्या पुण्यातील विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज एकाच वेळी नागरी सोयी सुविधांच्या बाबतीत स्थायी लोकअदालतमध्ये 10 खटले दाखल केले. आयएलएस महाविद्यालय, शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे हे विद्यार्थी आहेत. 

पुणे - ऍड. असीम सरोदे यांच्यासोबत कार्यरत असलेल्या पुण्यातील विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज एकाच वेळी नागरी सोयी सुविधांच्या बाबतीत स्थायी लोकअदालतमध्ये 10 खटले दाखल केले. आयएलएस महाविद्यालय, शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे हे विद्यार्थी आहेत. 

विद्यार्थ्यांनी सामाजिक स्वास्थ्य, सार्वजनिक बससेवा, स्वच्छता अशा विविध विषयांवर तक्रारदार म्हणून स्वतः खटले दाखल केले आहेत. कायद्याचा उपयोग करून सामान्य माणूसही सामाजिक प्रश्नांना कशा प्रकारे वाचा फोडू शकतो, कायदेविषयक सक्रियता तसेच कायद्याचा सामाजिक कामांसाठी उपयोग कसा करावा, याची माहिती या संधीतून मिळाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. 

या उपक्रमातून सुखदा खेडकर, अंकिता पुलकंटवार, महेश भवाळ, ऐश्वर्या भावसार, निखिल जोगळेकर, देवांगिनी तेलंग, श्रुती टोपकर, विक्रांत खरे, युवराज झंझाड, हेमंत प्रभुणे, हर्षल जाधव, शुभम बिचे, पूर्वा बोरा या विद्यार्थ्यांनी स्थायी लोक अदालत खटले दाखल केले आहेत. 

स्थायी लोक अदालतमध्ये कोणत्याही प्रकारची कोर्ट फी भरावी लागत नाही. प्रवाशी वाहतूक सेवा, टपाल, तार, दूरध्वनीबाबत सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, विमाबाबतच्या सेवा, निवृत्तिवेतन, रिअल इस्टेट, शैक्षणिक संस्था आदी सार्वजनिक उपयुक्तता सेवांबाबतच्या समस्या चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतात. 

प्रचलित आणि परंपरागत कायद्याचे शिक्षण पुरेसे नाही. ते व्यापक करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे स्थायी लोक अदालतीचा वापर केल्याने ती व्यापकता येऊ शकते. विद्यार्थ्यांनी स्वतः विषय निवडणे, त्यावर संशोधन करणे, खटले दाखल करणे आणि ती स्वतः चालवणे यातून त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. तसेच स्थायी लोकअदालतीचा वापर करुन, सामान्य नागरिकाला नागरी सुविधांबाबतचे स्वतःचे प्रश्न अत्यंत सोप्या पद्धतीने सोडविता येतील. 
- ऍड. असीम सरोदे 

रोज भेडसावणाऱ्या शहरातल्या समस्यांवर लोक अदालतीत कशाप्रकारे खटले दाखल करू शकतो? पाहा "ई सकाळ'च्या फेसबुक लाइव्हमध्ये 
आज (शनिवार) दुपारी चार वाजता. 

Web Title: Law college students initiative in standing lokadalat