अदानी, अंबानींसाठी कायदे बदलले - चौधरी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

पुणे - सध्याच्या सरकारमधील राज्यकर्त्यांचा अर्थकारणाशी काडीचा संबंध नाही. अदानी आणि अंबानी या उद्योगपतींना हाताशी धरून कामगार कायदे बदलले जात असल्याचा आरोप विश्‍वंभर चौधरी यांनी केला. 

कॉंग्रेस भवनात राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेसच्या (इंटक) वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, इंटकचे अध्यक्ष कैलास कदम, ऍड. म. वि.अकोलकर आदी मान्यवर तसेच संघटनेशी संलग्न 30 संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

चौधरी म्हणाले, ""केंद्रातील सरकार कामगारांच्या अहिताचे निर्णय घेत आहेत. उद्योगपतींना पोषक आणि कामगार कायदे दररोज बदलले जात आहेत. अदानी आणि अंबानींच्या मर्जीनुसार हे कायदे बदलले जात आहेत. सरकारकडून देशात भयप्रद भांडवलवाद सुरू असून, त्यामुळे लाखो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळत आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी लोककल्याणकारी आणि कामगारहिताचे कायदे राबविले होते.'' 

शहराध्यक्ष बागवे म्हणाले, ""केंद्रातील सरकार कामगारांऐवजी रोबो आणून कामगार वर्गाला गुलाम बनवू पाहत आहे. बेरोजगारीमुळे कामगारवर्ग हवालदिल झाला आहे. बेकारांचे तांडे वाढत चालले आहेत. त्यामुळे केंद्र व राज्यातील कामगारविरोधी सरकार घालविले पाहिजे.'' 

या वेळी कदम, अकोलकर यांचेदेखील भाषण झाले. मनोहर गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. अनिल औटी यांनी आभार मानले. 

Web Title: Laws changed for Adani Ambani - Chaudhary