धनकवडीत वकिलाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

कात्रज - धनकवडीत श्रीनगर येथे राहणारे वकील युवराज ननावरे (वय 50) यांनी सोमवारी संध्याकाळी त्यांच्याच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. 

कात्रज - धनकवडीत श्रीनगर येथे राहणारे वकील युवराज ननावरे (वय 50) यांनी सोमवारी संध्याकाळी त्यांच्याच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. 

ननावरे हे 25 वर्षांपासून वकिलीचा व्यवसाय करत होते. दक्षिण पुणे वकील संघटनेचे मार्गदर्शक म्हणूनही ते कार्यरत होते. सोमवारी दुपारी वकील मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्वजण गुलाबनगर येथे एकत्र जमले होते. सायंकाळी जेवणाचा कार्यक्रम असल्याने वाढदिवस साजरा केल्यानंतर ननावरे आपल्या ऑफिसला आले. संध्याकाळी पाच वाजता ननावरे यांचे भाचे सत्यजित कदम कार्यालयाकडे आले. बाहेरून दार ठोठावले असता प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे दरवाजा तोडून आतमध्ये पाहिले असता ननावरे यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. सोलापूर जिल्ह्यातील देवळाली येथील ननावरे हे धनकवडीत स्थिरावले होते. तसेच, ते शिवाजीनगर न्यायालयात वकिली करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असत. 

Web Title: lawyer suicide in pune