न्याय मिळवून देणाऱ्या वकिलावरच अन्याय; पोटच्या मुलाने म्हातारपणी काढले घरातून बाहेर

The lawyer was taken out of the house by his son in old age
The lawyer was taken out of the house by his son in old age

पुणे : अन्याय, अत्याचार झालेल्या अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मात्र म्हातारपणी मुलांकडून होत असलेल्या त्रासाबाबत आणि त्यांनी दैनंदिन खर्चासाठी पोटगी द्यावी म्हणून चाळीस वर्ष प्रॅक्टीस केलेल्या वकिलावरच न्यायालयात जाण्याची वेळ आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे आणि सातारा न्यायालयात वकिली केलेल्या एका 65 वर्षीय वकिलाने याबाबत दावा केला आहे. अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे तसेच दोन वेळा ऍन्जिओग्राफी झाल्यामुळे संबंधित वकील त्यांचा वकिली व्यवसाय करू शकत नाही. त्यामुळे पैसे आणि कौटुंबिक प्रेमासाठी ते मुलांवर अवलंबून आहेत. मात्र लाडात वाढवलेली दोन्ही मुलं त्यांची जबाबदारी विसरले आहेत. वृद्ध वडिलांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसून उपचारासाठी पैसे देखील देत नाहीत. त्यामुळे देखभाल आणि उपचारासाठी पैसे मिळावेत म्हणून या ज्येष्ठ वकिलाने दोन्ही मुलांविरुद्ध अॅड. राजेश कातोरे, अॅड. नीलिमा खर्डे आणि अॅड. साक्षी परबत यांच्यामार्फत प्रथमवर्गन्यादंडाधिकारी न्यायालयात दावा दाखल केला आहे. अर्जदार वकिलाला लॉकडाऊनच्या काळात दोन्ही मुलांनी एक लाख रुपये आणि दर महिना 50 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी दाव्यात केली आहे. अर्जदार यांचा एक मुलगा टॅटू आर्टिस्ट आहे तर दुसऱ्याचे पेट हाऊस आहे. दोन्ही मुलं चांगली कमावती आहेत. अर्जावर 14 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

मालकीच्या फ्लॅटमधून हुसकावले : 
वकिलीच्या व्यवसायातून मिळालेल्या रकमेतून अर्जदार यांनी स्वतः आणि पत्नीच्या नावावर फ्लॅट घेतला होता. तो फ्लॅट हिसकावून मुलांनी त्यांना घराबाहेर काढले. सध्या ते एकटेच न्हरे या ठिकाणी रहात आहेत. त्यांच्या कडून घेतलेले पैसे परत दिले नाहीत. याप्रकरणी अर्जदाराने वानवडी आणि हडपसर पोलिसांकडे तक्रार केली होती मात्र यांच्या तक्रार अर्जाची दखल घेण्यात आली नाही.

प्रवाशांनो, लोहगाव विमानतळावरून रात्रीच्या फ्लाईट्स बंद, कारण...

''दहा वर्षांपूर्वी आलेला अर्धांगवायूचा झटका आणि दोन ऍन्जिओग्राफी झाल्याने अर्जदार वकिली व्यवसाय करू शकत नाही. अर्जदाराला 65 टक्के अपंगत्व आलेले आहे. असे असताना मुलांनी त्यांचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला आहे. विविध आजारांमुळे ग्रस्त असल्यामुळे त्यांना पूर्णवेळ हाऊस मेड आणि नर्सची आवश्यकता आहे. त्यासाठी उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे मुलांकडून देखभाल खर्च मिळावा म्हणून त्यांनी दावा दाखल केला आहे.''
- ऍड. राजेश कातोरे, अर्जदारांचे वकील 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com