The lawyer woman tried to commit suicide in the Pune court
The lawyer woman tried to commit suicide in the Pune court

पुणे : वकील महिलेचा न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिला वकिलाने आज न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित महिलेवर डेक्कन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्या जिल्हा न्यायालयातील जुन्या इमारतीमध्ये असलेल्या न्यायालयात हजर होत्या. सुनावणी झाल्यानंतर सव्वाचारच्या सुमारास त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्या जमिनीवर कोसळल्यानंतर जवळच्या परिसरातील वकिलांनी त्वरित पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलून महिलेला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठवून दिले आहे. 

टिळक यांचे वकील नंदू फडके यांच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच नंदू फडके यांचा मुलगा संदीप फडके यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महिलेवर डेक्कन पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर 
महिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. आपण तपासात सहकार्य करण्यासाठी तयार असून पोलिसांनी चौकशी करावी, असा अर्ज देखील त्यांनी डेक्कन पोलिसांनी दिला आहे. मात्र टिळक यांच्यावरील दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. तसेच त्यांना गुंतवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या सर्वांमुळे त्या तणावाखाली आहेत, अशी माहिती त्यांचे वकील मिलिंद पवार आणि वकील अहमद खान पठाण यांनी दिली. तसेच महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला नाही. दोन दिवस व्यवस्थित जेवण न केल्याने त्यांना चक्कर आली असल्याचे पठाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com