मनाचिये वारी : एकच मागणे मागूया "वारी चुको न दे हरी'

laxman maharaj.jpg
laxman maharaj.jpg

Wari 2020 : वारी हे वारकऱ्यांचे जीवन आहे. वारीत मिळणारे सुख शब्दबद्ध करता येत नाही. ते अनुभवल्याशिवाय सांगूच शकत नाही. आषाढी वारीपूर्वी दोन महिने वारीचे वेध लागतात. वारी ही आनंदाची पर्वणी आहे. वारीच्या वाटचालीत कितीही दमलो, भागलो तरी दररोज नित्यनवा आनंद मिळत असतो. वयाच्या आठव्या वर्षापासून वारीशी जोडलो गेलो. माऊलींच्या सोहळ्यात भारूडाच्या माध्यमातून मानाची सेवा करण्याची संधी अनेक वर्षांपासून मिळत आहे. वेळापूरजवळ जेव्हा माऊलींच्या पालखीसमोर भारूड सादर करण्याचे भाग्य लाभते, ते जीवनातील सर्वोच्च आनंदाचे क्षण असतात. वारीत जो तो आपापल्या परीने परमार्थ साधण्याचा प्रयत्न करीत असतो. माझ्याकडून माऊली भारूडाच्या रूपाने सेवा करून घेते. संतवचनांच्या माध्यमातून मनोरंजनातून समाजप्रबोधनाची वारी माझ्याकडून घडते, हे मी माझे भाग्य समजतो.

गेली पन्नास वर्ष माऊलींनी वारीत माझ्याकडून भारूडाची सेवा करून घेतली. यंदा कोरोनाच्या साथीमुळे वारी रद्द झाली, पण मला माऊलींच्या पादुकांसमोर आळंदीत सेवा करण्यासाठी बोलावणे आल्याने माझी वारी पूर्ण झाली, अशी माझी भावना आहे. तेही माझे भाग्यच आहे. वारी नसल्याने घरी करीत असलेल्या कामात लक्ष लागत नाही. अखंड वारीच्या मार्गाचा ध्यास लागतो. त्या सोहळ्यात कधी एकदा जायला मिळते, असे होऊन जाते. कोरोनामुळे यंदाच्या वारीवर आलेले संकट पाहता, देवाकडे एकच मागणे मागावसे वाटते, आम्हा वारकऱ्यांची "वारी चुको न दे हरी'.

(शब्दांकन : शंकर टेमघरे)


दरवर्षी आळंदीपासून माऊलींच्या सोहळ्यात चालत असतो. वेळापूरला सोहळा आला की, आनंदाला पारावार राहत नाही. यंदा कोरोनामुळे ना वारीचा आनंद, ना गावात सोहळा. कधी एकदा पुढची वारी येते असे झाले आहे.''
- दिगंबर गुरव, वेळापूर  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com