माजी सभापतींची रस्त्यालगत कोथिंबीर विक्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

चाकण - शेतीमाल बाजार समितीत कमी किमतीत विकण्यापेक्षा तो चाकण (ता. खेड) येथील गुरुवारच्या बाजारात विकण्यास खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण टोपे यांनी प्राधान्य दिले. एक जुडी दहा रुपये या प्रमाणे त्यांनी विक्री केली. कोथिंबिरीच्या दोन हजार जुड्या त्यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या. 

चाकण येथील माणिक चौकाजवळील जुन्या पुणे-नाशिक महामार्गावरील गुरुवारचा बाजार प्रसिद्ध आहे. या बाजारात बहुसंख्य कामगारांची गर्दी असते. एमआयडीसीतील कंपन्यांचा सुटीचा दिवस असल्याने कामगार कुटुंबासह भाजीपाला व इतर खरेदीसाठी बाजारात येतात. त्यामुळे शेतीमालाला चांगला भाव मिळतो. अडत, हमाली नसल्याने शेतकरी रस्त्यालगत बसून, उभे राहून शेतमाल विकतात. याबाबत बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण टोपे यांनी सांगितले की, रस्त्यावरच्या या बाजारात शेतीमालाला चांगला भाव मिळतो. अडत, हमाली द्यावी लागत नाही. माझ्या शेतातील कोथिंबीर सुमारे दोन हजार जुड्या मी विक्रीसाठी आणल्या आहेत. स्वतः उभा राहून विक्री करत आहे. शेतकऱ्यांनी स्वतः शेतीमाल विकला तर त्याला फायदा मिळतो.

Web Title: laxman tope saling Coriander