कलेतून समाजाची सेवा करण्यास तत्पर

शिवशंकर सभागृह, महर्षीनगर - लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे ‘लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार’ वितरण सोहळ्यात क्रीडापटू ऋतुजा भोसले यांच्या वतीने नीता भोसले यांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी (डावीकडून) शिवराज कदम-जहागिरदार,मनीषा साठे व भोसले.
शिवशंकर सभागृह, महर्षीनगर - लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे ‘लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार’ वितरण सोहळ्यात क्रीडापटू ऋतुजा भोसले यांच्या वतीने नीता भोसले यांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी (डावीकडून) शिवराज कदम-जहागिरदार,मनीषा साठे व भोसले.

पुणे - ‘‘परमेश्वराने सर्वांनाच डोळे दिले आहेत. पण, समाजातील दु:खी, कष्टी वर्गासाठी काम करण्याची, त्यांची परिस्थिती जाणून घेण्याची दृष्टी ठराविक व्यक्ती व संस्थांना दिली आहे. त्यामुळे आम्हीदेखील आमच्या कलेतून अशा समाजातील गरजू घटकांची सेवा करण्यास तत्पर आहोत,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कथक नृत्यांगना मनीषा साठे यांनी व्यक्त केले. 

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे ‘लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. त्या वेळी साठे बोलत होत्या. या वेळी पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. सुचेता धामणे, दृष्टिहीनांकरिता कार्य करणाऱ्या सकिना बेदी व युवा क्रीडापटू ऋतुजा भोसले यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. कटारे म्हणाल्या, ‘‘ विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी पुण्याला खूप काही दिले आहे. जीवनात केलेले कष्ट आणि त्याची जाणीव यामधून जर आपण स्वप्न पाहिले, तरच ते तडीस नेता येते.’’ पाटील म्हणाल्या, ‘‘अंधारमय जीवन जगणाऱ्या समाजातील दुर्लक्षित घटकांना प्रकाश दाखविण्याचे काम पुण्यातील अनेक संस्था व व्यक्ती करीत आहेत. 

त्यामध्ये महिलांचा वाटा मोठा असून, एखादी स्त्री स्वबळावर काय करू शकते. याची अनेक उदाहरणे पुण्यात आहेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com