कामचुकार कर्मचाऱ्यांवर महावितरणकडून कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

पुणे - थकबाकी वसुलीची मोहीम सुरू असताना वसुलीकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात महावितरणने कठोर कारवाई सुरू केली आहे. सर्वाधिक थकबाकी असलेल्या औरंगाबाद, लातूर, नांदेड, जळगाव आदी परिमंडलातील नऊ अधिकारी व कर्मचारी निलंबित झाले आहेत, तर 40 जणांपेक्षा अधिक जणांना थकबाकीची अपेक्षित वसुली न केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. 

सद्यस्थितीत महावितरणची आर्थिकस्थिती बिकट आहे. वीजबिल थकबाकीची वसुली करण्याशिवाय तरणोपाय नसल्याने राज्यभरात मोहीम सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत वीजबिल व थकबाकीची वसुली 4000 कोटींपेक्षाही अधिक झालेली नाही. 

महावितरणने निर्देश देऊनही अनेक भागात अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून थकबाकी वसुलीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, लेखा अधिकारी, तंत्रज्ञ अशा नऊ जणांना निलंबित केले आहे. तर जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात 4 कार्यकारी अभियंत्यांसह 39 अतिरिक्त कार्यकारी अभियंता, लेखा अधिकारी, सहायक अभियंता आदींना तसेच नांदेड परिमंडलातील 4 कार्यकारी अभियंता आणि लेखा अधिकाऱ्यांना अपेक्षित प्रमाणात वीजबिल व थकबाकी वसुली न केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

Web Title: Lazy workers taking action on mseb