हडपसर - पाणीटंचाईच्या काळात पाणी भरणा केंद्रावर गळती

संदिप जगदाळे
शनिवार, 28 एप्रिल 2018

हडपसर (पुणे) : रामटेकडी येथील महापालिकेच्या टॅंकर भरणा केंद्रावर ऐन पाणीटंचाईच्या काळात रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. येथील पाच पैकी चार पॉईंटचे व्हॅाल्व नादूरूस्त झाल्याने मोठया प्रमाणात रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या केंद्रावरील ही गळती रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने आतापर्यंत कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.

हडपसर (पुणे) : रामटेकडी येथील महापालिकेच्या टॅंकर भरणा केंद्रावर ऐन पाणीटंचाईच्या काळात रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. येथील पाच पैकी चार पॉईंटचे व्हॅाल्व नादूरूस्त झाल्याने मोठया प्रमाणात रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या केंद्रावरील ही गळती रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने आतापर्यंत कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.

हडपसर उपनगरात पाणी पुरवठा विभागाकडून अगोदरच पाणी कपात केली आहे. त्यामुळे नागरिकांना टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागते. त्यासाठीचा खर्च अफाट आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. हडपसरचे लोकप्रतिनिधी पाणी कपात कमी करावी यासाठी पालिकेच्या सभागृहात भांडत आहेत. मात्र त्यांची हाक प्रशासनापर्यंत पोहचत नाही, हे वास्तव आहे. अनेक भागात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत आहे. त्यातच उन्हाळा तिव्र असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे टॅंकर व्यावसायिकांची तेजी सुरू आहे. हडपसर उपनगराचे नागरिकरण झपाटयाने होत आहे. लोकसंख्या मोठया प्रमाणात वाढल्याने गेल्याने पिण्याच्या पाण्याची गरज मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. मात्र पाणीगळतीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. तसेच या केंद्रावरील एका पॅांईटवरील मिटर देखील नादूरूस्त झाल्याने पाण्याचा काळाबाजार होतो, अशी तक्रार नागरिकांनी सकाळशी बोलताना केली. 

याबाबत महापालिका लष्कर पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता गौतम गांवड म्हणाले, आम्ही वांरवार या व्हॅालव्हची दुरूस्ती करतो. मात्र प्रत्येक वेळी टॅंकर भरण्यापूर्वी व नंतर व्हॅाल्वह चालूबंद केला जातो. त्यामुळे तो सातत्याने बिघडतो. तातडीने रामटेकडी येथील पाणी भरणा केंद्रावरील पाणी गळती रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.

गळक्या टँकरकडे दुर्लक्ष
रामटेकडी येथून रोज दोनशे ते अडीशे टॅंकर भरले जातात. मात्र अनेक टॅंकरला देखील मोठया प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे पाणी वायाला जाते. तसेच हे पाणी रस्त्यावर सांडत असल्याने अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे अशा टॅंकर चालकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

Web Title: leakage of water in scarcity of water in hadapsar pune