पुणे - राज्यातील विद्यार्थ्यांना अभ्यासाचे साधन म्हणून आता शिक्षण खाते व्हॉट्सॲपचा वापर करणार आहे. या स्वाध्याय उपक्रमाच्या माध्यमातून पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या फोनवर क्वीझ (प्रश्नमंजूषा) घरच्या घरी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्यासाठी स्वाध्यायाचा हा प्रयोग करण्यात येत आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राज्यातील शाळा कोरोनामुळे सात महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी बंद आहेत. ‘शाळा बंद; पण शिक्षण चालू’ उपक्रमांतर्गत टिलीमिली, अभ्यासमाला असे विविध उपक्रम विभागातर्फे सुरू आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि लिडरशीप फॉर इक्विटी यांच्यामार्फत हा पुढाकार घेण्यात आला आहे. ‘स्वाध्याय’ या उपक्रमात विद्यार्थी घरच्या घरी स्वाध्याय सोडवतील. त्यातून शिक्षक आणि पालक विद्यार्थ्यांच्या सद्यःस्थितीबद्दल जाणून घेऊ शकतील. सुरुवातीला मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणिताचे विषय सुरू झाले असून, काही दिवसांत उर्दू माध्यमही सुरू केले जाईल. एका स्मार्ट फोनद्वारे शंभर विद्यार्थी यात सहभागी होऊ शकणार आहेत.
उपक्रमाची वैशिष्ट्ये
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.