घोडमध्ये शेवटचे उन्हाळी आवर्तन (व्हिडिओ)

युनूस तांबोळी
शुक्रवार, 25 मे 2018

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): शिरूर तालुक्‍यातील घोड नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र पाटबंधारे खात्याने डिंबा उजव्या कालव्यातून उन्हाळ्यातील शेवटचे आवर्तन सोडले आहे. कवठे येमाई (ता. शिरूर) येथील फत्तेश्वर बंधाऱ्याकडे पाणी आल्याने शेतकरी समाधान व्यक्त करू लागले आहेत.

गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने धरणात पाणीसाठा शंभर टक्के झाला होता. त्यामुळे पाटबंधारे खात्याला देखील या वर्षी पाण्याचे व्यवस्थापन करण्यास सोपे गेले. चासकमान, डिंबा, वडज, माणिकडोह, येडगाव या धरणांत साठलेले पाणी शंभर टक्के उपयुक्त ठरले आहे. पाणीसाठा असला तरी त्याचे व्यवस्थापन योग्य होणे गरजेचे असते. त्यानुसार पाटबंधारे खात्याने शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याचा योग्य वापर व्हावा या दृष्टीने कालव्या मार्फत व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून पाणी पुरवठा केला आहे. त्यामुळे आठमाही पाण्याचे व्यवस्थापन हे बारमाही व्यवस्थापन ठरले आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील ढापे काढण्यात येतात. त्यामुळे अवघ्या 15 दिवसांचे पाणी आवर्तन म्हणून मिळणार आहे. त्याचा फायदा सभोवतालच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. शुक्रवारी सकाळी डिंभा धरणातून चांडोह (ता. शिरूर) येथील बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले. सायंकाळपर्यंत ते कवठे येमाई बंधाऱ्यापर्यंत पोचले होते. कोरड्या पडलेल्या घोडनदीचे पात्र पुन्हा पाण्याने वाहू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Web Title: To leave the water in ghoad nadi