पालखी मार्ग सोडून उर्वरित क्षेत्राचा मोबदला मिळावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

वडापुरी : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील डांबरी रस्ता सोडून उर्वरित क्षेत्राचा मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी बुधवारी वडापुरी येथे श्रीनाथ मंदिरात हरकतींवर घेण्यात आलेल्या सुनावणी वेळी प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्याकडे केली आहे. 

सदरची मागणी मंजूर होणेसाठी शेतकऱ्यांनी प्रत्येक गावातील ग्रामसभेचे ठराव हे प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे द्यावेत असे आवाहन संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग समिती वडापुरी यांनी केली आहे.

नियोजित असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग 925) भूसंपादनाच्या कामानिमित्त हरकतींवरील सुनावनीसाठी प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या उपस्थित झाली. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीस उत्तर देताना प्रांताधिकारी निकम म्हणाले की, 20 वर्षां पेक्षा जास्तकाळ वहिवाट असल्याने, वाहिवाटीच्या क्षेत्राचा मोबदला मिळणार नाही. तत्पूर्वी मुळ राजमार्ग 125 चे भूसंपादन झालेले नसून ते क्षेत्र शेतकऱ्यांच्या 7 /12 पत्रकी आहे व त्याचा शेतसारा कर शेतकरी भरत आहेत. त्यामुळे मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक हरकतींना प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी सविस्तर उत्तरे दिली. प्रारंभी वडापुरी ग्रामस्थांच्या वतीने निकम यांचा महेंद्र काळे यांच्या हस्ते प्रांताधिकारी निकम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष देशमुख, बापू चंदनशिवे, विजय पवार, बापू रेडेकर, केशव सुर्वे, रज्जाक मुलाणी, शरद सावंत, दादासाहेब जगताप, अजिनाथ कदम, मेजर चंद्रकांत माळेवाडी तसेच राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी कारेकर व संबंधित सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Leaving the Palkhi route, get the remuneration for the rest of the area