‘भारताबाहेरील भारत’बद्दल शनिवारी व्याखान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

पुणे : प्राचीन काळात भारतीय संस्कृतीचा विस्तार आजच्या भारताबाहेर होता. कंबोडिया, इंडोनेशिया या देशांत त्याच्या खुणा आजही पाहायला मिळतात. येथे झालेला भारतीयांचा प्रवेश, त्यांनी या भागात स्थापन केलेली राज्ये, त्यांनी उभारलेल्या वास्तू याविषयी माहिती घेण्याची संधी येत्या शनिवारी मिळणार आहे.

पुरातत्व विषयाचे अभ्यासक आनंद कानिटकर ‘भारताबाहेरील भारत’ या विषयी बोलणार आहेत. येत्या शनिवारी (२१ जानेवारी) नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात हे व्याख्यान होईल. संध्याकाळी ६.३० वाजता व्याख्यान सुरू होईल.

कंबोडिया येथील जागतिक वारसा स्थळ असलेले अंकोरवट हे मंदिर, तसेच अंकोरथॉम आदी मंदिरे, इंडोनेशियातील काही वारसास्थळे, आजही अकराव्या-बाराव्या शतकातील भारतीय संस्कृती असणारे बाली या साऱ्यांविषयी कानिटकर बोलतील. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असून निःशुल्क आहे. टीजीसीएल टूर्सतर्फे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: lecture on india out of india