श्रीनिवास सोहोनी यांचे आज व्याख्यान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

पुणे - ‘सकाळ साप्ताहिक’च्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासन व धोरणविषयक तज्ज्ञ, निवृत्त आयएएस अधिकारी श्रीनिवास सोहोनी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. उद्या मंगळवारी (ता. ४) होणाऱ्या या कार्यक्रमात ‘भारताची सुरक्षितता - काही पैलू’ या विषयावर ते बोलणार आहेत. बालगंधर्व रंगमंदिरात संध्याकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. 

‘भारताची सुरक्षा’ हा, सोहोनी यांच्या व्यासंगाचा विषय आहे. डेहराडूनच्या डून स्कूल आणि दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये शिक्षण झालेले सोहोनी हे गव्हर्नन्सविषयक तज्ज्ञ व व्यूहात्मक धोरणाचे विश्‍लेषक आहेत. १९७० मध्ये त्यांनी भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केला. राज्य, केंद्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी तब्बल ४५ वर्षे संरक्षण, उद्योग, परराष्ट्र मंत्रालय, कॅबिनेट अफेअर्स, राज्यसभेचे महासचिव, महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. राष्ट्रपतींचे सचिव म्हणूनही सोहोनी कार्यरत होते. 

अफगाणिस्तानच्या अध्यक्षांच्या कार्यालयात वरिष्ठ सल्लागार म्हणून त्यांनी २००६ ते १४ दरम्यान काम पाहिले आहे. इस्लामचा इतिहास, इस्लामी दहशतवाद, तसेच दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याबाबत नागरी समाजाचा दृष्टिकोन हे सोहोनी यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.

Web Title: lecture of Srinivas Sohoni