एलईडी जॅकेटचा प्रचारासाठी वापर (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवार सध्या अद्ययावत साधनांचा वापर करीत आहेत. यापैकीच एक म्हणजे एलईडी जॅकेट. कार्यकर्त्याच्या अंगावरील हे जॅकेट लोकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत असून, या माध्यमातून प्रचारही रंगतदार होत आहे.

पुणे - मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवार सध्या अद्ययावत साधनांचा वापर करीत आहेत. यापैकीच एक म्हणजे एलईडी जॅकेट. कार्यकर्त्याच्या अंगावरील हे जॅकेट लोकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत असून, या माध्यमातून प्रचारही रंगतदार होत आहे.

एखाद्या सभेत किंवा अगदी रस्त्याने चालत असताना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपला प्रचार व्हावा म्हणून एलईडी जॅकेटचा वापर करण्यात येत आहे. जॅकेटवर एलईडीचा पॅनेल बसविण्यात आला आहे. त्याद्वारे उमेदवाराचा फोटो, त्याने केलेल्या विकासकामांची व आश्‍वासनांची माहिती, तसेच छोटासा व्हिडिओ दाखविला जात आहे. बॅटरीवर चालणारी ही स्क्रीन जॅकेटलाच लावण्यात आली आहे, अशी माहिती जॅकेटचे निर्माते संतोष यादव यांनी दिली.

Web Title: LED Jacket use for publicity