पुणे जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

पुणे - जिल्ह्यातील दहा नगरपालिकांचे निकाल आज (गुरुवार) जाहीर झाले. पुणे जिल्ह्यातील बारामती व लोणावळा नगर पालिकावगळता अन्य आठ ठिकाणी सरासरी 73.67 टक्के मतदान झाले होते. पुणे जिल्ह्यातील बारामतीसह इंदापूर, जेजुरी, सासवड, दौंड, शिरूर, जुन्नर, आळंदी आदी निकालांबाबत उत्सुकता होती. पुणे जिल्ह्यात नगरसेवकांची 223 पदे असून, त्यासाठी 894 उमेदवार रिंगणात होते.

इंदापूरमध्ये नगराध्यक्षपद काँग्रेसकडे
इंदापूरमध्ये काँग्रेसने नगराध्यक्षपद आपल्याकडे राखण्यात यश मिळविले आहे. नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या अंकिता शहा विजयी झाल्या आहेत. त्यांनी 6771 मते मिळाली. याठिकाणी काँग्रेस 9, राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या आहेत.

तळेगाव दाभाडेत भाजप आघाडीकडे सत्ता
तळेगाव दाभाडे नगरपालिकेत 26 पैकी 15 जागा जिंकून भाजपप्रणित जनसेवा विकास आघाडीने 15 जागा जिंकून सत्ता राखली आहे. तळेगावच्या नगराध्यक्षपदी चित्रा जगनाडे यांनी विजय मिळविला आहे. 

आळंदीत भाजपला सर्वाधिक जागा
आळंदी नगरपालिकेत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत नगराध्यक्षपदही मिळविले आहे. नगराध्यक्षपदी वैजयंता उमरगीकर यांची निवड झाली आहे. आळंदीत भाजपने सर्वाधिक 10 जागा मिळविल्या आहेत. तर, शिवसेनेला 6 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या.

दौंडमध्ये नगराध्यक्षपद नागरिक हित आघाडीकडे
दौंड नगरपालिका नगराध्यक्षपदी रासप नागरिक हित संरक्षण मंडळाच्या शीतल योगेश कटारिया विजयी झाल्या आहेत. मात्र, याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 आणि रासप नागरिक हित आघाडीचे 9 उमेदवार विजयी झाले आहेत.

शिरूरमध्ये भाजपचा धुव्वा
शिरुर नगरपालिकेत भाजपचा धुव्वा उडाला आहे. 21 जागांपैकी विकास आघाडीने तब्बल 15 जागा जिंकल्या आहेत. तर, भाजपप्रणित क्रांती आघाडीला 2 जागा जिंकल्या आहेत. एक अपक्षाला जागा मिळाली आहे. नगराध्यक्षपदी वैशाली वाखारे यांची निवड झाली आहे.

जेजुरीचे नगराध्यक्षपद काँग्रेसकडे
जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद काँग्रेसने मिळविले आहे. याठिकाणी काँग्रेसच्या विणा सोनावणे विजयी झाल्या आहेत.

Web Title: Legislative council election result in pune district