सकाळ आणि देवदत्त फोटोग्राफी स्कूलतर्फे आयोजित लेह-लडाख स्लाइड शोमध्ये छायाचित्रानुसार माहिती देताना देवदत्त कशाळीकर.
सकाळ आणि देवदत्त फोटोग्राफी स्कूलतर्फे आयोजित लेह-लडाख स्लाइड शोमध्ये छायाचित्रानुसार माहिती देताना देवदत्त कशाळीकर.

लेह-लडाखचं उलगडलं सृष्टी सौंदर्य

पिंपरी - लेह लडाख, सृष्टी सौंदर्यानं नटलेला प्रदेश. उंचच उंच हिमशिखरं आणि खोलखोल दऱ्या. ढगांच्या सावल्यांमुळे क्षणाक्षणाला पालटणारे रूप. रंग बदलणाऱ्या नद्या, डोंगर आणि आकाश. रक्त गोठवणारं थंडगार वारं. ऑक्‍सिजनचं कमी प्रमाण. सीमेपलीकडे चीनच्या संशयास्पद हालचाली. कारगील युद्धाच्या आठवणी. लष्कराची तीक्ष्ण नजर. निसर्गाशी सामना करणारं खडतर लोकजीवन. जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या लामांचं वास्तव्य, असा श्रीनगरच्या दाल सरोवरापासून लडाखमधील खाऱ्यापाण्याच्या पेंगाँग सरोसरापर्यंतचा छायाचित्रमय प्रवास पिंपरी-चिंचवडकरांनी अनुभवला. निमित्त होते ‘सकाळ’ आणि देवदत्त फोटोग्राफी अँड स्कूलतर्फे आयोजित ‘स्लाईड शो’चे. 

चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी २५४ छायाचित्रांच्या माध्यमातून रसिकांना लेह-लडाखचे दर्शन घडविली. प्रत्येक छायाचित्राची तांत्रिक बाजू समाजावून सांगताना तेथील वातावरण व लोकजीवनाची माहिती सांगितली. रसिकांच्या शंकांचे निरसन केले. हौशींसह व्यावसायिक छायाचित्रकार व पर्यटकांना लेह-लडाखमध्ये छायाचित्र काढण्यासाठीच्या टिप्स दिल्या.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, जगविख्यात छायाचित्रकार मुरलीधर पवार यांचे चिरंजीव कैलास पवार व नगरसेवक राजेंद्र गावडे प्रमुख 
पाहुणे होते. 

अशी होती छायाचित्रे...
दाल सरोवरचे नयनरम्य दृष्य, शेळ्या- मेंढ्या चारणारा चिमुकला, रुबाबदार तरुण, जीवनाचे अनेक चढ-उतार अनुभवल्याची ओळख करून देणाऱ्या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरील सुरकत्या, कारगील युद्धाची विजय गाथा सांगणाऱ्या खुणा, शत्रुच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी डोंगराच्या शिखरावर निशाणा साधणारी तोफ, नद्यांचे वेगवेगळी रंग-रुपे, भूईला स्पर्श करणारे ढग, बौद्ध स्तुफ, शांततेचा संदेश देणारे लामा, धार्मिक शिक्षण देणारी धर्मस्थळे, थ्री इडिएट चित्रपटाचे छायाचित्रण झालेलं ठिकाण अशी छायाचित्रे कशाळीकर यांनी सादर केली. ओघवत्या शैलीत त्यांची माहिती दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com