पुणे : विनापरवाना सावकारीचा धंदा जोमात

Lender-Bussiness
Lender-Bussiness

पुणे : सहकार विभागाने अवैध सावकारी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये राज्यात 782 सावकार विनापरवाना धंदा करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी 411 जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, सहकार विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या सावकारांकडून एक हजार 237 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. 

राज्यात सहकार विभागाकडे नोंदणीकृत सावकारांची संख्या सध्या दहा हजारांहून अधिक आहे. या सावकारांकडून कृषी कर्ज आणि बिगर कृषी कर्जापोटी एकूण सुमारे एक हजार 237 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यात कृषी कर्जाची रक्‍कम अत्यल्प असून ती केवळ 25 लाखांच्या जवळपास आहे. परंतु बिगर कृषी कर्ज वाटप मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये तारण ठेवून देण्यात आलेल्या कर्जाची रक्‍कम सुमारे एक हजार 148 कोटी रुपये इतकी आहे. तर, केवळ 90 कोटी रुपये इतकी कर्ज रक्‍कम विनातारण देण्यात आल्याची माहिती सहकार विभागाकडून प्राप्त झाली आहे. 

राज्यात मार्च 2019 अखेर नोंदणीकृत सावकारांची संख्या 12 हजार 754 इतकी होती. परंतु जुलैअखेर सुमारे दीड हजारांहून अधिक सावकारांच्या अर्जांचे नूतनीकरण झालेले नाही. तर, काही सावकारांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. नोंदणीकृत सावकारांना कर्जदारांकडून नियमानुसार व्याज घेणे बंधनकारक आहे. 

पुण्यात सर्वाधिक सावकार 

पुणे विभागात नोंदणीकृत सावकारांची संख्या सर्वाधिक दोन हजार 229 इतकी आहे. त्यात पुणे शहरात एक हजार 158, पुणे ग्रामीणमध्ये 345 आणि सोलापूर जिल्ह्यात 726 इतकी आहे. मुंबई विभागात एक हजार 840, कोकण 843, कोल्हापूर एक हजार 70, लातूर 533, अमरावती 247 आणि नागपूर विभागात 835 नोंदणीकृत सावकार आहेत. 

टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई 

अवैध सावकारांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी नुकतीच एक समिती नेमण्यात आली आहे. अवैध सावकारी विरोधातील कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांना दिल्या आहेत. परंतु काही जिल्हा उपनिबंधक अवैध सावकारांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस ही समिती करणार आहे. 

नोंदणीकृत सावकारांची संख्या : 10 हजार 16 
कृषी कर्ज वाटप : 25 लाख 66 हजार रुपये 
बिगर कृषी कर्ज वाटप : 1237 कोटी 13 लाख रुपये 
एकूण कर्ज वाटप : 1237 कोटी 79 लाख रुपये 
कर्जदार संख्या : 6 लाख 49 हजार 

वर्ष 2019 मधील ठळक घटना 

बारामती जि.पुणे येथे तरुणाची आत्महत्या 
लाखनी-भंडारा येथे सावकाराकडून कर्जवसुलीसाठी जीवे मारण्याची धमकी 
पुसद-यवतमाळ येथे शेतकऱ्याची जमीन हडपणाऱ्या अवैध सावकारावर छापा 
खामगाव - अवैध सावकारीच्या वादातून दोघांचा खून 
अकोला- सहकार विभागाकडून दहा सावकारांवर कारवाई 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com