रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी वाढणार
पिंपरी - वाढत्या प्रवासी संख्येमुळे रेल्वेकडून डब्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. प्रवाशांना रेल्वेत चढ-उतार करणे सुलभ व्हावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर ते लोणावळादरम्यानच्या सर्व स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये या कामाला सुरवात होणार असून, पुढील दीड वर्षात ते पूर्ण करण्यात येणार आहे.

प्लॅटफॉर्मची लांबी वाढल्यानंतर या स्थानकांवर वीस डब्यांची गाडीदेखील थांबू शकणार आहे. सध्या या प्लॅटफॉर्मवर १६ ते १७ डबे असलेल्या रेल्वेगाड्या थांबतात. प्लॅटफॉर्मची लांबी वाढवत असताना त्यांचे नूतनीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. पुण्याहून मुंबई व इंदूरकडे जाणाऱ्या गाड्या पिंपरी-चिंचवडमधील स्थानकावर थांबतात. सुटीच्या कालावधीत या गाड्यांना मोठी गर्दी असते.
दरम्यान, या मार्गावर ज्या ठिकाणी गाड्या थांबतात, त्या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी कोच गायडन्स सुविधा उभारण्याचे नियोजन आहे.
प्लॅटफॉर्म लांबी वाढवण्याच्या कामासाठी १४ कोटी रुपये खर्च अपेक्षित
रेल्वेकडून निविदा काढण्याचे काम हाती
मेल, एक्स्प्रेस गाड्यांबरोबरच लोकलच्या कोचमध्येही वाढ
शिवाजीनगर, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, मळवली, वडगाव, तळेगाव या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची वाढणार लांबी
हे काम हाती घेतल्यानंतर डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. याखेरीज चिंचवड आणि देहूरोड स्टेशनवर काही नव्या सुधारणा करण्यात येणार आहेत.
- मिलिंद देऊस्कर, विभागीय महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग
पिंपरी स्टेशनवर थांबणाऱ्या गाड्या : सह्याद्री आणि सिंहगड एक्स्प्रेस
चिंचवड स्टेशनवर थांबणाऱ्या गाड्या : ग्वाल्हेर एक्स्प्रेस, इंदूर एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ एक्स्प्रेस, पनवेल-नांदेड एक्स्प्रेस