बिबट्याचा तरुणांवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

पिंपळवंडी - आळेफाट्यावरून शनिवारी रात्री वडगाव आनंदमार्गे सौरभ पवार व प्रशांत पवार हे दोन मित्र पवारपट्टा- पिंपळवंडी येथे येत असता त्यांच्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला.  उसाच्या शेतामध्ये लपलेल्या बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला; परंतु बिबट्याची झेप चुकली आणि दुचाकीच्या मागील बाजूस बिबट्याचा पंजा लागला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दोघेही घाबरले आणि त्यांनी दुचाकीचा वेग वाढविला. या परिसरातच वीस दिवसांपूर्वी बिबट्याने एका दांपत्यावर हल्ला केला होता. पिंपळवंडी परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. अनेक वेळा शेळ्या, कुत्रे बिबट्याचे भक्ष्य बनले आहेत.

पिंपळवंडी - आळेफाट्यावरून शनिवारी रात्री वडगाव आनंदमार्गे सौरभ पवार व प्रशांत पवार हे दोन मित्र पवारपट्टा- पिंपळवंडी येथे येत असता त्यांच्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला.  उसाच्या शेतामध्ये लपलेल्या बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला; परंतु बिबट्याची झेप चुकली आणि दुचाकीच्या मागील बाजूस बिबट्याचा पंजा लागला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दोघेही घाबरले आणि त्यांनी दुचाकीचा वेग वाढविला. या परिसरातच वीस दिवसांपूर्वी बिबट्याने एका दांपत्यावर हल्ला केला होता. पिंपळवंडी परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. अनेक वेळा शेळ्या, कुत्रे बिबट्याचे भक्ष्य बनले आहेत. वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: leopard attack on youth