बिबट्यासाठी पिंजरा बसवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

रांजणगाव सांडस - शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव सांडस परिसरातील आलेगाव पागा, नागरगाव, आरणगाव, उरळगाव, राक्षेवाडी आदी गावांत बिबट्याचे पाळीव प्राण्यावर हल्ले वाढत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अजित रणदिवे व पांडुरंग रणदिवे यांनी केली आहे.

रांजणगाव परिसरात मुळा- मुठा, भीमा या नद्यांच्या काठच्या परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. पाणी व आडोसा यामुळे या भागात बिबट्यांची संख्या वाढलेली आहे. वन विभागाकडून बिबट्याबाबत मार्गदर्शन होण्याची गरज आहे. या परिसरातील गावात बिबट्याचा वावर वाढलेला आहे. पाळीव प्राण्यावरील हल्ल्यात वाढ झाली आहे. काही ठिकाणी ग्रामस्थांसह शेतक-यावर हल्ले झाले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी घरा बाहेर पडणे मुश्‍किल झाले आहे.  

रांजणगाव येथील लोखंडे वस्तीवरील वसंत लकडे यांच्या शेळ्याच्या कळपातील काही शेळ्याचा फडशा बिबट्याने पाडला आहे. बापू कोळपे व तात्याबा पठारे यांच्या मेढ्याच्या कळपातील काही मेढ्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. रांजणगाव येथील मोरमळा व मळईच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाले. आराणगावमधील दत्तात्रेय श्रीराम यांच्या मेंढ्याच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला होता, पण यांनी प्रसंगावधान राखून मेंढ्यांची बिबट्यापासून सुटका केली. 

उरळगावातील अविनाश जांभळकर व महेंद्र कोळपे यांनाही बिबट्याचे दर्शन अनुक्रमे जांभळकर वस्ती व कोळपे वस्ती या ठिकाणी नुकतेच घडले आहे. अशोक कुंडलिक भोसले यांच्या दुचाकी गाडीचा बिबट्याने पाठलाग केल्याचा घटना घडलेल्या आहे. त्यामुळे बिबट्याच्या बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी रणदिवे यांनी केली.

Web Title: Leopard Cage