
गेली काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर असून लोकांना त्याने दर्शनही दिले होते.
पुणे : शिरूर- भीमाशंकर राज्यमार्गावर खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील चास कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बुरसेवाडीच्या तनपुरे वस्तीजवळ गुरुवार (ता 28) सकाळच्या सत्रात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार झाला.
गुन्हेगारी टोळी वाकडमध्ये जेरबंद
गेली काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर असून लोकांना त्याने दर्शनही दिले होते. या घटनेची माहिती कळताच राजगुरूनगर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन, सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कासारे, वनपरिमंडल अधिकारी नितीन विधाटे यांसह एस. बी. वाजे, ए. आर. गटे, एस. आर. राठोड यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
विद्यार्थ्यांशिवाय शाळा; विद्यार्थी चार फेब्रुवारीपासून
या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सदर बछडा हा साधारण तीन महिने वयाचा असून मादी बछडा आहे. प्रथम दर्शनी हा मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेने झालेला दिसत असून त्याचे शवविच्छेदन राजगुरूनगर येथे करण्यात येणार असून त्या नंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.