esakal | बारामतीत बिबट्याची मादी जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard caught at Baramati

बारामतीत बिबट्याची मादी जेरबंद

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर : बारामती व इंदापूर तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याच्या मादीला जेरबंद करण्यात वनविभाग व रेस्क्यू पथकाला यश आले.आज (ता. १३) पहाटे कन्हेरी (ता.बारामती) परिसरातमध्ये बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

10 डिसेंबर 2019 मध्ये बारामती तालुक्यातील एमआयडीसी कंपनीत बिबट्याचे दर्शन झाले होते. 30 जानेवारी 2020 मध्ये कन्हेरीमध्ये नर बिबट्याला जेरबंद  केल्यानंतर याचवेळी बिबट्याची मादी बिबट्या पिंजऱ्याच्या जवळ बराच वेळ ठाण मांडून बसली होती.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या पंधरा दिवसांमध्ये मादी बिबट्याने बारामती व इंदापूर तालुक्यात धुमाकूळ घालून मेंढ्या बकरी वासरे व कुत्र्यांचा प्रश्न पडला होता. गेल्या तीन दिवसापूर्वी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केला. काल बुधवार रोजी बिबट्याने पिंजऱ्याला वळसा घालून गेली. मात्र आज गुरुवारी पहाटे संतोष जाधव यांच्या शेतामध्ये लावलेले पिंजऱ्यामध्ये दुसरा बिबट्या सापडल्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

loading image