Leopard : सहा फूट उंचीची संरक्षण भिंत ओलांडून बिबट्या थेट बंगल्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

leopard crossed six feet high protection wall forest department animal pune

Leopard : सहा फूट उंचीची संरक्षण भिंत ओलांडून बिबट्या थेट बंगल्यात

मंचर : संरक्षक भीत असली की बिबट्या येत नाही. अशी सुरक्षिततेची भावना अनेक बंगला धारकांची आहे. पण तब्बल सहा फूट उंचीच्या संरक्षण भीतीवरून उडी मारून प्रवेश करून कुत्र्याला उचलून नेल्याची घटना नुकतीच मंचर (ता.आंबेगाव) येथे घडली आहे. त्यामुळे मंचर शहर व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंचर शहराच्या पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर एस.कॉर्नर येथे भरवस्तीत शेतकरी श्रीराम वामनराव गांजाळे यांच्या बंगल्याला तटबंदी संरक्षक भीत असून लोखंडी प्रवेशद्वार आहे. बिबट्याचा या भागात वावर होता, पण संरक्षण भिंती असल्यामुळे बिबट्या येणार नाही असा समज गांजाळे कुटुंबाचा होता.

श्रीराम गांजाळे यांचा काळू नावाचा लाडका कुत्रा दिसत नव्हता. कदाचित कुत्रा बाहेर गेला असेल तो परत माघारी येईल म्हणून कुटुंबीय वाट पाहत होते. पाच ते सहा दिवस होऊनही काळू घरी आला नाही. त्यामुळे नुकतेच गांजाळे कुटुंबीयांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना धक्काच बसला. चक्क बिबट्या कुत्र्याला घेऊन जाता असताना दिसला.

दरम्यान यापूर्वीही शरद सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुर्यकांत थोरात यांच्या चांडोली बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील राहत्या बंगल्याचे सहा फुट उंचीच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून कुत्र्याचा फडशा पडल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

“गेल्या तीन महिन्यात बिबट्याने अनेक कुत्र्यांचा फडशा पडला आहे. सहा ते सात शेळ्या मेंढ्या व वासरे फस्त केली आहेत. काही दुचाकी स्वरांवरही हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा.”

- प्रशांत बागल, बांधकाम व्यावसायिक मंचर (ता.आंबेगाव)