Video : ...अन् 'त्या' पिल्लांना मिळाली आईची ऊब  

leo.jpg
leo.jpg

जुन्नर : माणिकडोह (ता. जुन्नर) येथील बिबट बचाव केंद्राने आजअखेर बिबट्यांच्या 73 बछड्यांना आईच्या कुशीत सोपविले आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी दिली. मंगळवार (ता. 19) नागरगाव (ता. शिरूर) येथे ऊसतोडणीच्या वेळी तीन बिबट पिल्ले कांतिलाल धुमाळ यांच्या शेतात सापडली होती. याबाबत त्यांनी वनविभाग शिरूर यांना कळविले. 

वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी माणिकडोह बिबट बचाव केंद्र यांना याविषयी माहिती देऊन येथे बोलविले असता बिबट बचाव केंद्राचे डॉ. अजय देशमुख व त्यांचे सहकारी यांनी बिबट बछड्यांची पाहणी केली. त्यांना मायक्रोचिप लावली व त्या पिल्लांना तेथेच त्यांच्या आईकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. कॅमेरा ट्रॅप लावून सुमारे पाचशे मीटर अंतरावर थांबून पथकाने निरीक्षण केले असता, सायंकाळी साडेसहा वाजता बिबट मादी आली तिने सुरवातीला पहिले पिल्लू 6.43 ला नेले.

तसेच दुसरे 7. 23 ला तर 7. 53 ला तिसरे पिल्लू घेऊन गेली. रात्री आठ वाजेपर्यंत तीनही बछडे आईच्या कुशीत विसावले. यात एक नर व दोन मादी होत्या. पिल्लं परत केल्यामुळे आई चिडून हल्ले करत नाही व पिल्लांचे पुढील जीवन आई सोबत जाते. यासाठी वनपाल प्रवीण क्षीरसागर, वनरक्षक भानुदास शिंदे, शिरूर ग्रामस्थ तसेच रेस्क्‍यू टीमचे सुधीर चितळे शरद गदाबे, सुनील कळसकर, गोविंद शेलार यांचे सहकार्य लाभले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com