जातेगावकर बिबट्यामुळे सध्या भयभित अवस्थेत (व्हिडिओ)

भरत पचंगे
शनिवार, 30 जून 2018

शिक्रापूर (पुणे): गेल्या अनेक दिवसांत जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथे पन्नासहून अधिक आबलावृध्दांना दिसलेल्या बिबट्याचे मोबाईल शुटींग सादर केल्यावर आज (शनिवार) वन विभागाने पिंज-याची व्यवस्था केली. अर्थात जातेगावात केवळ एकच बिबट्या नाही तर त्याच्यासोबत आणखी दोन त्याचे बछडे असल्याने असलेला मादी जातीचा बिबट्या हिंस्र असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केल्याने जातेगावकर सध्या भयभित अवस्थेत आहेत.

जातेगाव खुर्द परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिक सांगत आहेत. याबाबत वनविभागाकडे तक्रारी करुनही काहीच फरक पडत नव्हता. वाढलेले ऊस क्षेत्र आणि बिबट्याला लपण्यासाठी असलेल्या जागांमुळे बिबट्याचा वावर सर्रास झालेला आहे. मात्र केवळ तक्रारींवरुन वनखाते अद्यापपर्यंत गंभीर नव्हते. अर्थात जातेगावच्या हद्दीवर असलेल्या करंदी परिसरातही बिबट्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस राजाभाऊ ढोकले यांनी पंधरा दिवसांपूर्वी व्हिडीओ फितीसह वनविभागाला दिली होती. मात्र काहीच कार्यवाही झाली नाही.

दरम्यान, काल रात्री नऊच्या सुमारास जातेगाव खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष खंडाळे व ग्रामपंचायत सदस्य प्रविण कौठकर यांना दोन वेगवेगळ्य़ा ठिकाणी बिबट्या आढळले. त्याचे मोबाईल छायात्रितणही दोघांसह ग्रामस्थांनी केले. याबाबत आज सकाळी वनविभागाच्या वनपाल एस. बी. राठोड यांचेकडे ही चित्रफित पाठविल्यावर वनविभागाने तातडीने दोन पिंजरे पाठविल्याची माहिती प्रविण कौठकर यांनी दिली.

दरम्यान, वनविभागाच्या आजच्या पाहणीत सदर आढळलेला बिबट्या हा मादी जातीचा असून उपल्ब्ध पावलांच्या ठशावरुन त्याचे सोबत दोन बछडेही असणार आहेत. सोबत बछडे असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बिबट्या रागावलेल्या स्थितीत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो हिंस्र बनू शकण्याची शक्यता वनखात्याकडून ग्रामस्थांना सांगितली गेल्याने जेमतेम दोन हजार लोकवस्तीचे जातेगाव खुर्द गाव बिबट्याच्या भितीने भयभित आहे. याबाबत ग्रामस्थांची जागृतीसह बिबट्या लवकर कसा जेरबंद होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती श्री कौठकर यांनी दिली असून बिबट्यामुळे याभागातील रात्रीचे भारनियमन रद्द करण्याची मागणीही श्री कौठकर यांनी केली.

जातेगाव खुर्द (ता.शिरूर) येथे काल रात्री आढळलेला हा मोबाईल कॅमे-यात कैद अस्पष्ट दिसत असलेला बिबट्या.

Web Title: leopard found in jategaon at shirur taluka