शिरुर: तामखरवाडीमध्ये सापडली चार बिबट्याची पिल्ले

युनूस तांबोळी
रविवार, 25 मार्च 2018

वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद...
सायंकाळी साडेसातच्या दरम्यान बिबट्याची मादि घटनास्थळी आली होती. तिने आजूबाजूला पहात सावधरित्या पावित्रा घेतला. पायाने माती उकरत तिने कॅरेट बाजूला केली. त्यातून तिन पिल्ले तोंडात घेऊन तिने येथून पलायन केले. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास वनविभागाने तापसणी केल्यावर एक पिल्लू कॅरेटमध्ये होते. रात्री उशीरा हे पिल्लू देखील बिबट्याच्या मादिने सुरक्षीत ठिकाणी नेले असल्याचे सकाळी डॅा. देशमुख यांनी सांगितले. दरम्यान ही क्षणचित्रे वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

टाकळी हाजी : टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील तामखरवाडी मध्ये उसाच्या शेतीत ऊस तोडणी कामगारांना बिबट्याची चार पिल्ले सापडली. सायंकाळी तातडीने माणीकडोह ( ता. जुन्नर ) येथील ही वनविभागाच्या वतीने चारपिल्ले कॅरेट मध्ये ठेवण्यात आल्याने मादिने घेऊन गेल्याचे आढळले.  

शिरूर ताकुल्यातील टाकळी हाजी परीसर घोड व कुकडी नदिच्या पाण्यामुळे बागायती झाला आहे. नदीकाठच्या भागात ऊसाचे क्षेत्र वाढल्याने 13 ते 14 महिने या परीसरात बिबट्यांना वास्तव्य करून राहण्यासाठी आडोसा मिळतो. गर्भावस्थेतील मादी या काळात बिबट्यापासून बचाव करण्यासाठी अशा परीसरात वास्तव्य करून राहतात. तामखरवाडी परीसरात गेल्या काहि दिवसापासून पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले होते. अनेकांना बिबट्याचे दर्शन घडल्याने वावर निश्चित होता. शनीवार ( ता. 24 ) रामदास केरू खोमणे यांच्या शेतात ऊस तोडणी मजूर ऊसाची तोडणी करताना बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला. त्यावेळी तातडीने याबाबतची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याची पिल्ले कॅरेट मध्ये ठेवली. बिबट्याची पिल्ले सापडल्याची वार्ता कळाल्यावर सेल्फीसाठी गर्दी झाली होती. यावेळी ग्रामस्थांनी बिबट्याच्या मादिला जेरबंद करण्याची मागणी केली. सायंकाळी वनविभागाच्या माध्यमातून ही पिल्ले कॅरेट मध्ये ठेवण्यात आली होती.

सोमवार ( ता. 25 ) बिबट्याच्या मादिने पिल्ले घेऊन गेल्याचे वनविभागने कळविले आहे. दरम्यान माणीकडोह ( ता. जुन्नर ) येथील पशुवैद्यकिय अधिकारी डॅा. अजय देशमुख म्हणाले की, 2009 ते 2017 पर्यंत वनविभागाने 46 पिल्लांना मादिच्या स्वाधिन केले आहे. या ठिकाणी 2 नर व 2 मादी अशी 4 पिल्ले 20 दिवस वयाची सापडली आहेत. दिवसभर बिबट्याच्या मादिला पिल्ले भेटली नसल्याने तिचे मातृत्व अधिक जागृत झाले असेल. पिंजरा लावल्यावर ती पिंजऱ्यात सापडली नाही तर ती हिंसक बनून मानवावर हल्ला करू शकते. त्यासाठी या काळात येथे पिंजरा लावणे योग्य नाही. 

वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद...
सायंकाळी साडेसातच्या दरम्यान बिबट्याची मादि घटनास्थळी आली होती. तिने आजूबाजूला पहात सावधरित्या पावित्रा घेतला. पायाने माती उकरत तिने कॅरेट बाजूला केली. त्यातून तिन पिल्ले तोंडात घेऊन तिने येथून पलायन केले. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास वनविभागाने तापसणी केल्यावर एक पिल्लू कॅरेटमध्ये होते. रात्री उशीरा हे पिल्लू देखील बिबट्याच्या मादिने सुरक्षीत ठिकाणी नेले असल्याचे सकाळी डॅा. देशमुख यांनी सांगितले. दरम्यान ही क्षणचित्रे वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

Web Title: leopard found in shirur taltuka pune