टाकवे बुद्रुक परिसरात दिसला बिबट्या

leopard
leopard

टाकवे बुद्रुक (पुणे) : साई नाणोलीच्या डोंगरावर पवनचक्की परीसरात, शुक्रवारी (ता. 9) सायंकाळी सातच्या सुमारास बिबट्या आढळला. सह्याद्रीच्या या पठारावर बिबट्या अनेक वेळा आढळून आला आहे. बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सह्याद्रीच्या पठारावर डोंगरवाडी,सटवाईवाडी,पालेपठार,करंजगाव पठार, उकसान पठार, कांब्रे पठार येथे लोकवस्ती आहे. विशेषत धनगर बांधवांच्या पाच ते सात विरळ वस्त्या आहे. 

मागील एक महिन्यापूर्वी येथील बापू ठिकडे या शेतकऱ्याची कालवडीवर बिबट्याने हल्ला केला होता. यात ही कालवड मृत्यू पावली होती. वनविभागाने या मृत कालवडीचा पंचनामाकेला आहे. या डोंगरावर वीजनिर्मितीसाठी पवनचक्क्या उभ्या केल्या  आहे, येथील कर्मचारी कामे पूर्ण करून कार्यालयाकडे माघारी येत असताना पवनचक्कीच्या टाॅवर लगत बिबट्या बसलेला आढळला. येथील कामगार विशाल पिंगळे,तानाजी धुमाळ, दत्ता भालेराव, गणेश शेंडगे,सचिन पवार,हेमराज कोंडल यांनी चारचाकी थांबून बिबट्याची काही छायाचित्रे काढली.

एकीकडे छायाचित्र काढणारे हे कर्मचारी दुसरीकडे भीतीने घाबरले होते. त्यांनी तातडीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना या बाबतची माहिती दिली. सह्याद्रीच्या या पठारावर भेकरं,ससा, रानडुक्कर ही श्वापदे आढळतात, तसे तरस बिबट्या ही आढळून येते आहे.शिरोता वनक्षेत्र परिमंडळाचे अधिकारी पी.व्ही.कापसे म्हणाले, "या डोंगर पठारावर तरस,बिबट्या आढळत आहे, नागरिकांनी सतर्क रहावे. बिबट्या आढळल्यास तातडीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी. रात्रीच्या वेळी एकट्याने फिरू नये, स्वसंरक्षणासाठी सुतळी बाँब सारखे फाटके बिबट्या आढळल्यास वाजवावे.झोपण्यापूर्वी लहान मुले, शेळ्या मेढया यांच्या सुरक्षिततेची खात्री करावी. बिबट्याने हल्ला करून मृत पावलेल्या जनावरांची वनविभागाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com