कळंबमध्ये दुसरा बछडाही जेरबंद (व्हिडिओ)

कळंब (ता. आंबेगाव) - पिंजऱ्यात गुरुवारी रात्री जेरबंद झालेला बिबट्या.
कळंब (ता. आंबेगाव) - पिंजऱ्यात गुरुवारी रात्री जेरबंद झालेला बिबट्या.

महाळुंगे पडवळ - आंबेगाव तालुक्‍यातील कळंब- धरणमळा परिसरात धुमाकूळ घातलेल्या बिबट्यांच्या दोन बछड्यांतील दुसरा बछडाही सलग दुसऱ्या दिवशी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. मात्र, आपले दोन्ही बछडे पकडले गेले असल्याने मादी सैरभैर झाली आहे. येथे दिवसाही तिचे दर्शन होऊ लागल्याने मारुती ऊर्फ बाबूनाथ कहडणे यांचे कुटुंब दहशतीखाली आहे. 

कळंब- धरणमळा परिसरात दोन बछड्यांसह एका मादीचा वावर होता. त्यापैकी एक बछडा बुधवारी (ता. १६) रात्री पकडला होता. दुसरा बछडा व मादी पकडण्यासाठी मेंगडेवाडी येथून पिंजरा आणण्यासाठी समीर कहडणे, विक्रम चासकर, सचिन चासकर वस्तीवरील तरुणांनी प्रयत्न केले. गुरुवारी (ता. १७) रात्री पुन्हा मारुती कहडणे यांच्या शेळ्यांच्या गोठ्यानजीक पिंजरा लावण्यात आला. पिंजऱ्यात सावज म्हणून मेंढी ठेवण्यात आली होती. रात्री दोन वाजता पिंजऱ्याच्या खटक्‍याचा व बिबट्यांच्या डरकाळ्यांचा आवाज आला. त्या वेळी पिंजऱ्याकडे बॅटरीच्या प्रकाशात पाहिले असता बछडा अडकल्याचे दिसले. त्यानंतर अर्धा तासात तेथे अजून एक बिबट्या पिंजऱ्याभोवती घिरट्या घालून डरकाळ्या फोडत होता, असे सचिन कहडणे यांनी सांगितले. वनपरिमंडल अधिकारी सोमनाथ खुंटे व कोंडीभाऊ डोके यांना 

पकडलेला दुसरा बछडा एक ते दीड वर्षाचा असून, नर जातीचा आहे. पकडलेल्या या दोन्ही बछड्यांमुळे बिबट्याची मादी धरणमळा परिसरात फिरत आहे. नागरिकांना दिवसाही तिचे दर्शन होत आहे. त्यामुळे येथे पुन्हा पिंजरा लावला जाईल. या भागातून ये- जा करताना नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. शक्‍यतो रात्री घराबाहेर पडू नये. 
 - व्ही. आर. वेलकर, वनपरिमंडल अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com