पुणे शहर परिसरात बिबट्याचा वावर वाढला, सरकारने उपाययोजना करावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Siddharth Shirole

पुणे शहर परिसरातील वारजे जवळच असलेल्या न्यू अहिरे परिसरात बिबट्याचा वावर आढळल्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती.

MLS Siddharth Shirole : पुणे शहर परिसरात बिबट्याचा वावर वाढला, सरकारने उपाययोजना करावी

पुणे - बिबट्या आणि अन्य वन्य प्राण्यांचा वावर वारजे परिसरात वाढला आहे. अशा घटना वारंवार घडत आहेत. याची दखल घेऊन सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (सोमवारी) विधानसभेत केली. वारजे परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याचा मुद्दा पॉईंट ऑफ इन्फर्मेशन द्वारे आमदार शिरोळे यांनी सभागृहात उपस्थित केला.

आज सकाळी पुणे शहर परिसरातील वारजे जवळच असलेल्या न्यू अहिरे परिसरात बिबट्याचा वावर आढळल्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. परंतु नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

या ठिकाणी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे. तिथे जवळच असलेल्या जंगलातून बिबट्या मानवी वस्तीत शिरला असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या पूर्वीही या परिसरात बिबट्या शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार येथे बिबट्या दिसत असल्याने अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी आ.शिरोळे यांनी सभागृहात बोलताना केली.

टॅग्स :puneMLALeopard