सांगवडे, दारुंब्रेमध्ये बिबट्याची दहशत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

सोमाटणे - सांगवडे, दारुंब्रे परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

सोमाटणे - सांगवडे, दारुंब्रे परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सांगवडेच्या हद्दीतील पानमंद वस्तीजवळील पांधण रस्त्यावर उसाच्या शेताजवळ काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसला. खबर गावात समजताच अमोल राक्षे, गणेश राक्षे, शुभम वाघोले, अमर सोरटे, सोमनाथ राक्षे हे खात्री करण्यासाठी जीपमधून पानमंद वस्तीकडे गेले. तेथे बिबट्या उसाच्या शेताच्या कडेला बसलेला दिसला. सांगवडे येथील शेतकरी भीमराव राक्षे यांच्या श्‍वानाचा बिबट्याने फडशा पाडला. यामुळे दिवसभर भीतीचे वातावरण होते. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. ठशांची पाहणी केली. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी त्वरित पिंजरे लावावेत, अशी मागणी पोपट राक्षे यांनी केली. गेल्या महिन्यात बिबट्याने कासरासाई येथील शेळी व काही कुत्री फस्त केली होती. या घटनेनंतर पुन्हा बिबट्याचे सांगवडे येथे दर्शन झाले.

Web Title: Leopard Sangawade Darumbre