जुन्नर: बिबट्याकडून तीन दुचाकीस्वारांचा पाठलाग

पराग जगताप
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

जुन्नर तालुक्यातील ओतूर, डिंगोरे, उदापूर, नेतवड, सारणी, अहिनवेवाडी, मांदारणे, पिंपळगाव जोगा व इतर परिसरातील बिबट प्रवणगावात बिबट्याचे दर्शन होणे हि नित्याची बाब आहे. मात्र काही काळा पासून बिबट्याचे दुचाकीवर होणारे हल्ले ही जुन्नर तालुक्यातील जनतेसाठी चिंतेची बाब ठरु लागली आहे. त्यामुळे मानव व बिबट संघर्ष वाढु लागला आहे.

ओतूर (ता. जुन्नर) : डिंगोरे ता. जुन्नर येथे रविवारी सायंकाळी डिंगोरे ते मराडवाडी मार्गावर आमले शिवारातील गजानन महाराज मंदिराजवळ उसात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने तीन दुचाकीचा पाठलाग करुन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तिन्ही दुचाकीस्वारांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. मात्र बिबट्या करत असलेल्या पाठलागामुळे वाड्यावस्त्यावर येजा करणाऱ्या नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारी सायंकाळी साडेसहा दरम्यान रवि लोहोटे हे डिंगोरे मराडवाडी मार्गाने घरी जात असताना आमलेशिवार परिसरात गजानन महाराज मंदिर जवळ उसात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकिचा पाठलाग केला. बिबट्या पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच रवि लोहटे मोठ्याने ओरडले व गाडी वेगात पळवली व घरी पोहचले, त्यानंतर सदर घटनेची त्यानी मित्रांना व वनविभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर सव्वा सात वाजे दरम्यान उमेश उकिर्डे हे त्याच मार्गाने घरी जात असताना बिबट्याने त्यांच्याही दुचाकिचा पाठलाग केला. त्यांनीही गाडीचा वेगवाढवुन गाडी पुढे नेली आणि बबन आमले यांच्या घरापाशी थांबवुन गाडी मागे वळवुन बिबट्या गाडीच्या प्रकाशात दिसतोय का हे पहात होते. त्याच वेळी मागून दुचाकीवर येत असलेले उल्हास आमले यांच्या दुचाकिचा बिबट्याने पाठलाग केला व त्यांच्या दुचाकिवर झेप घेवुन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही असफल ठरला त्या नंतर मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले व सदर घटनेची ओतूर वनविभागाला ही माहिती देण्यात आली. वनविभागाचे कर्मचार्यानी सदर ठिकाणी रस्त्यावर व परिसरात गस्त घातली.

जुन्नर तालुक्यातील ओतूर, डिंगोरे, उदापूर, नेतवड, सारणी, अहिनवेवाडी, मांदारणे, पिंपळगाव जोगा व इतर परिसरातील बिबट प्रवणगावात बिबट्याचे दर्शन होणे हि नित्याची बाब आहे. मात्र काही काळा पासून बिबट्याचे दुचाकीवर होणारे हल्ले ही जुन्नर तालुक्यातील जनतेसाठी चिंतेची बाब ठरु लागली आहे. त्यामुळे मानव व बिबट संघर्ष वाढु लागला आहे. याबाबत जनजागृती व बिबट प्रवणक्षेत्रात वावरताना आवश्य मार्गदर्शक सुचनाचे पालन होणे गरजेचे असुन वनविभागानेही याबाबत जनजागृती अभियान परत राबवणे गरजेचे आहे. तरी डिंगोरे व परिसरात वनविभागाने मोका पहाणी करुन बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावावा तसेच सायंकाळी बिबट्याचे दुचाकिवर हल्ले होणाऱ्या सर्वच मार्गावर गस्त घालावी अशी मागणि नागरिकां कडुन होत आहे.

डिंगोरे मराडवाडी यामार्गावरुन व इतर वाड्या वस्त्यावरुन डिंगोरे गावठाणात शाळेला येणार्या मुलांची संख्या शंभर च्या असपास असल्याने रविवारच्या घटने मुळे वनविभागानेच्या कर्मचार्यानी विद्यार्थ्याना शाळेत जाऊन रस्त्याने येतानाजाताना घ्यावयाची खबरदारी तसेच गटागटाने एकत्र यावे व बरोबर मोठे आवाज करणारे यंत्र बाळगावे किंवा मोठा आवाज करावा याबाबत माहिती दिली व तशा शाळेकडुनही सुचना देण्यात आल्या. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंगोरेतील ज्या विद्यार्थ्याना घरी नेणयासाठी पालक आले नाही त्या विद्यार्थ्याना याच शाळेचे शिक्षक राजेंद्र गारे यानी स्वता आज सोमवारी घरी पोहचवले. 

Web Title: leopard seen in Junnar